महानगरपालिकेच्या प्रचाराला कालपासून शुभारंभ झाला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फेरी ही सुरू झाल्या आहेत संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमित देशमुख यांना खुले चर्चेचे आव्हान दिल्यानंतर अमित देशमुख यांनी संभाजी पाटील निलंगेकर यांचा हा नवीन स्टंट असल्याचे म्हणत मिश्किल टोला लगावला आहे. मागील अडीच वर्षांमध्ये लातूर शहर महानगरपालिकेत भाजपाने केलेला कारभार हा भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे लातूरकरांच्या अपेक्षा भंग करणारा कारभार केला यामुळे आता सामान्य लातूरकर भाजपाला स्पष्ट नकार देईल असा विश्वास अमित देशमुख यांनी व्यक्त केला. यासोबतच लातूर शहर महानगरपालिकेत भाजपाचा झेंडा फडके असा विश्वास अमित देशमुख यांनी व्यक्त केला.
.






