महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शहरात मुक आंदोलन करण्यात आले. खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात काळ्या फिती लावून भाजप विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. राजकीय वादातून बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने सत्तेसाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा गंभीर दावा केला. या घटनेत एका निरागस व्यक्तीचा जीव गेला असून, पीडित कुटुंबाच्या पाठीशी महाविकास आघाडी कायम उभी राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.