निवडणुका जिंकण्यासाठी जर खून होण्याची परिस्थिती निर्माण होत असेल, तर अशा निवडणुकाच नकोत. आम्ही सर्व उमेदवारी अर्ज परत घेऊ, तुम्हीच जिंका, अशा तीव्र शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी राज्य सरकारवर गंभीर टीका केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरवदे कुटुंबाची परिस्थिती प्रत्यक्ष पाहिली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत अमित ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एक दिवस तरी प्रचार बाजूला ठेवावा आणि बाळासाहेब सरवदे यांच्या घरी भेट द्यावी. निवडणुका कोणत्या पातळीपर्यंत नेऊन ठेवल्या आहेत, हे त्यांना समजेल.