फोटो सौजन्य - Social Media
भारतामध्ये शेअर बाजारामध्ये गुणतवणूक कारण्याक्सचे प्रमाण वाढत चालले आहे. तरुणाई मोठ्या प्रमाणामध्ये शेअर बाजाराकडे आकर्षित होत आहेत. परंतु, देशामध्ये बहुतेक संख्या अशी आहे, ज्यांना गुंतवणूक तर करायची आहे. पण, जोखीम मुळीच घ्यायची नाही आहे. शेअर बाजार हा गुंतवणूकदारांच्या धीर तसेच जोखमीवर चालतो. शेअर बाजारामध्ये जोखीम घेण्याची तयारी असणारा व्यक्तीच पुढे जाऊ शकतो. अशा मध्ये जोखिमी शिवाय गुंतवणुकीची तयारी असणारे व्यक्तींना गुंतवणूक करणे कठीण होते. अशा वेळी, असे गुंतवणूकदार बँकेच्या फिक्स डिपॉजिटचा पर्याय निवडतात. महत्वाची गोष्ट म्हणजे यातून फार काही मोठा नफा होत नाही. पण, यामध्ये जोखीम फार कमी असते किंवा नसतेच. पण आपण कोणत्या बँकेमध्ये आपले पैसे गुंतवत आहोत? याचे भान प्रत्येक गुंतवणूकदाराला असणे फार महत्वाचे असते.
हे देखील वाचा : यंदाचा सोमवार ठरेल शेअर बाजारातील ‘बिग मंडे’; ‘या’ ३ IPO ची होणार लिस्टिंग
भारतातील काही बँका या फिक्स डिपॉजिट (FD)च्या रक्कमेवर चांगल्या दरात व्याज देत आहेत. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार याकडे आकर्षित झाले आहेत. मुळात, या बँका FD वर ९% दरापर्यंत व्याज देत आहेत. हे त्यांच्यासाठी उत्तम आहे, जे जोखिमीशिवाय गुंतवणूक करू इच्छितात. महत्वाची गोष्ट अशी कि, त्या बँकांची ही ऑफर फक्त तीन वर्षांसाठी आहे. तसेच फक्त ६० वर्षांखाली वय असणाऱ्या व्यक्तिंना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. एका ठराविक रक्कमेपर्यंतच ही ऑफर असणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात, त्या बँकांविषयी:
जर तुम्ही नॉर्थईस्ट स्मॉल फायनान्स या बँकेमध्ये ३ कोटींपेक्षा कमी रक्कमेची FD करून घेता तर बँक तुम्हाला सर्वात अधिक ९% दरावर व्याज पुरवते.
जर तुम्ही सूर्योदय स्मॉल फायनान्स या बँकेमध्ये FD करून घेता तर तुम्हाला ८.६ टक्क्यांच्या दरावर व्याज मिळेल. ही ऑफर तीन वर्षांपूर्ती मार्यादित आहे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक FD वर चांगल्या दरात व्याज पुरवत आहे. तीन वर्षांचा कालावधी असणारा हा FD ८.५% दरावर व्याज देत आहे.
तीन वर्षांच्या कालावधीवर जन स्मॉल फायनान्स बँक ८.२५% टक्के दारात व्याज देत आहे.
हे देखील वाचा : आता ‘या’ बाबतीत करु शकता 5 लाखांपर्यंत UPI पेमेंट, उद्यापासून सुरु होणार ही सुविधा
यूनिटी स्मॉल फायनान्स बँकची ही ऑफर तीन वर्षांमध्ये मॅच्युर होईल. या तीन वर्षांमध्ये गुंतवणूकदारांनीं बनवलेल्या FD वर ८.१५% व्याज पुरवण्यात येईल.
मुळात, वरील बँकाने जाहीर केलेले ऑफर अनेक गुंतवणूकदारांना आकर्षित करत असले. परंतु, महत्वाची गोष्ट अशी आहे कि वरील बँकेमध्ये गुंतवणूक करणे जोखीमीचे काम असू शकते. त्यामुळे गुंतवणूक करताना आपापल्या जोखमीवर गुंतवणूक करण्यात यावे. या बँकेमध्ये डिपॉजिट इंश्योरेंस एंड क्रेडिट गारंटी कॉर्पोरेशन (DICGC) च्या अनुसार गुंतवणूक करावे. DICGC ५ लाखांपर्यंतच्या रक्कमेला सुरक्षा देतो.