Will Tesla CEO Elon Musk become the world's first trillionaire? (photo-social media)
Elon Musk Salary : जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून एलन मस्क नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहेत. कंपनीने टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. टेस्ला इंक कंपनीच्या शेअरहोल्डर्सनी एलन मस्क यांच्यासाठी विक्रमी पॅकेज मंजूर केला आहे. जो जगातील पहिले ट्रिलियनेअर म्हणून एलन मस्क यांना मान देऊ शकतो. याची घोषणा होताच सर्वांनी एलन मस्क यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.
जगात श्रीमंतीचा रुबाब मिरवणारे आणि टेस्ला-स्पेसएक्स सारख्या दिग्गज कंपनीचे सीईओ एलन मस्क लवकरच ट्रिलियनेअर होणार आहेत. एलन मस्क यांच्यासाठी टेस्ला इंक कंपनीच्या शेअरहोल्डर्सनी त्यांच्या पगारासाठी मोठा पॅकेज मंजूर केला असून याने ते जगातील पाहिजे अब्जाधीश सीईओ म्हणून ओळखले जाणार आहेत.
जगातील पहिले ट्रिलिनेयर बनणार मस्क
टेस्ला इंक कंपनीच्या 75% शेअरहोल्डर्सनी मस्क यांच्या मोठ्या पगार पॅकेजला मान्यता दिली असून मस्क यांच्या कामावर आधारित निर्णय घेण्यात आला आहे. जर कंपनीने आर्थिक उद्दिष्टे साध्य केली तर एलन मस्क यांना सुद्धा याचा फायदा होऊन अब्जावधी डॉलर्सचे शेअर्स मिळू शकतात. त्यामुळे मस्क यांची संपत्ती 1 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक सुद्धा होऊ शकते.
हेही वाचा : Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरात चढउतार सुरुच, तुमच्या शहरातील आजचे भाव जाणून घ्या
आतापर्यंतच्या इतिहासात कोणत्याच कंपनीच्या सीईओला एवढे महागडे पॅकेज मिळाले नाही. मात्र, एलन मस्क यांनी ते मिळून दाखवले. मस्क यांच्या या पॅकेजची किंमत जवळपास न्यूझीलंड, हाँगकाँग, स्वित्झर्लंड, सिंगापूर आणि यूएई सारख्या देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक असेल.
एलन मस्क यांना टेस्लामध्ये अधिक काळ ॲक्टिव्ह ठेवण्याचा या पॅकेजचा मुख्य उद्देश आहे. टेस्ला गुंतवणूकदारांनी जर पगार वाढवण्याच्या पॅकेजला मान्यता दिली नाही तर नोकरी सोडून जाण्याची धमकी एलन मस्क यांनी दिली होती. मात्र, हे कंपनीच्या हितासाठी योग्य नव्हते म्हणून बोर्ड सदस्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. ही कंपनी एआय, स्वायत्त आणि रोबोटिक्स सारख्या तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे प्रकल्प राबवत असून प्रकल्पांवर मस्क यांनी लक्ष केंद्रित करून कंपनी सोडून जाण्याचा विचार करू नये असे बोर्ड सदस्यांना वाटत होते.
मस्क यांचे 12 भागात मान्य झालेले पॅकेट विभागले गेले असून येत्या दहा वर्षात टेस्लाच्या आर्थिक उदिष्टे पूर्ण होतील तसे प्रत्येक भाग कंपनीकडून अनलॉक करण्यात येईल. ते सर्व भाग अनलॉक होताच मस्क यांना तब्बल 423 दशलक्षपेक्षा अधिक शेअर्स मिळतील. ज्यामुळे मस्क यांचे टेस्लावरील नियंत्रण अधिक वाढेल. त्यामुळे येत्या दहा वर्षात मस्क अंदाजे $275 दशलक्ष दररोज नफा कमवू शकतात.
रोबोटिक्स, सेल्फ-ड्रायव्हिंग तंत्रज्ञान आणि एआय सारख्या तंत्रज्ञानात लक्षणीय प्रगती झाली तर, काही वर्षांत टेस्ला जगातील सगळ्यात श्रीमंत आणि मोठी कंपनी बनू शकते असा कंपनीच्या शेअरहोल्डर्सना अपेक्षा आहे.






