Samsung Galaxy S26 Ultra Leaks: किंमत आणि कलर ऑप्शन्स आले समोर... नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये करणार राडा
दक्षिण कोरियाई कंपनी Samsung पुढील महिन्यात त्यांचा प्रिमियम स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. त्या हिशोबाने तयारी देखील सुरु झाली आहे. या स्मार्टफोनच्या डिझाईन आणि हार्डवेयरमध्ये अपग्रेड असण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये अनेक तगडे फीचर्स देखील दिले जाणार आहेत. ज्यामुळे हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. कंपनी लवकरच ईव्हेंटचे आयोजन करून या स्मार्टफोनचे लाँचिंग करण्याची शक्यता आहे. कंपनी त्यांच्या गॅलेक्सी ईव्हेंटमध्ये Samsung Galaxy S26, Galaxy S26+ आणि Galaxy S26 Ultra स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. याशिवाय Samsung Galaxy S26 Edge आणि Galaxy S26 FE देखील याच सिरीजसोबत लाँच केले जाऊ शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्राचा एक फोटो टिप्स्टरने एक्सवर शेअर केला आहे. यामध्ये आगामी स्मार्टफोनचे कलर ऑप्शन्स शेअर करण्यात आले आहेत. इंडोनेशियाच्या एका टिप्स्टरने इंस्टाग्रामवर देखील या आगामी स्मार्टफोनचे डिटेल्स शेअर केले आहेत. असं सांगितलं जात आहे की, सॅमसंगचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन ब्लॅक शेडो, व्हाइट शेडो, गॅलेक्टियल ब्लू आणि अल्ट्रा व्हाइट रंगात लाँच केला जाण्याची शक्यता आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्रा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट जनरल 5 प्रोसेसरने सुसज्ज असणार आहे. या फोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB तक इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट दिला जाणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस 26 सीरीजचे तीन स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन वेबसाइट BIS वर लिस्ट झाले आहेत. त्यामुळे ग्लोबल मार्केटसह भारतात देखील या स्मार्टफोनचे लाँचिंग केले जाणार आहे. या सिरीजमधील स्टँडर्ड मॉडेल SM-S942B/DS आणि Plus मॉडेल SM-S947B/DS मॉडेल नंबर BIS वर लिस्ट करण्यात आले आहे. भारतात ही सिरीज Exynos 2600 प्रोसेसरसह लाँच केली जाण्याची शक्यता आहे.
सॅमसंगच्या या अल्ट्रा प्रीमियम फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 60W वायर्ड चार्जिंग सपोर्ट दिला जाणार आहे. याशिवाय या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील दिला जाणार आहे. हा अल्ट्रा फोन वायरलेस पावर ट्रांसफर, वाई-फाई 7, ब्लूटूथ, NFC आणि सॅटेलाइट कनेक्टिविटी फीचर्सने सुसज्ज असणार आहे. यामध्ये क्वाड कॅमेरा सेटअप मिळणार आहे. फोनमध्ये 200MP चा मुख्य, 50MP चा टेलीफोटो, 10MP चा टेलीफोटो प्रोट्रेट, 50MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला जाणार आहे. फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा असू शकतो. लीक्सवर विश्वास ठेवला तर भारतात Galaxy S26 ची किंमत 80,999 रुपयांपासून, S26+ ची किंमत 99,999 रुपयांपासून आणि Galaxy S26 Ultra ची किंमत 1,29,999 रुपयांपासून सुरू होऊ शकते.






