Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तबाही… Share Market मध्ये तुफानाचे संकेत, अमेरिकन बाजारात मोठी घसरण; आता भारताचा नंबर?

भारतीय शेअर बाजारात तितकीशी तेजी दिसून आली नाही. उलट, निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये किंचित घसरण होऊन व्यवहार बंद झाले. मात्र, आता सोमवारी शेअर बाजारात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाजारात मोठी घसरण होण्याची चिन्हे दिसत असल्याचं समोर येत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 07, 2026 | 11:52 AM
(फोटो सौजन्य: Pinterest)

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us
Follow Us:

शुक्रवारी रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा एवढा मोठा निर्णय आणि परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी केलेल्या अनेक उपाययोजना असं असताना देखील भारतीय शेअर बाजारात तितकीशी तेजी दिसून आली नाही. उलट, निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये किंचित घसरण होऊन व्यवहार बंद झाले. मात्र, आता सोमवारी शेअर बाजारात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाजारात मोठी घसरण होण्याची चिन्हे दिसत असल्याचं समोर येत आहे. नेमकी काय परिस्थिती असू शकते आणि काय आहेत त्या मागची कारणं?

LPG टंचाईच्या काळात सिलेंडरबाबत सरकारचे ‘हे’ 7 नियम जाणून घ्या, कधीही कापलं नाही जाणार तुमचं कनेक्शन

Gift Nifty ३५६ अंकांची घसरण दिसत आहे. यावरून हे स्पष्ट होते की, सोमवारी भारतीय बाजार मोठ्या ‘गॅप-डाऊन’सह उघडू शकतो आणि अनेक प्रमुख स्टॉक्समध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. इतकी मोठी घसरण होण्याची शक्यता निर्माण होण्यामागे नेमके काय कारण आहे, ते आपण समजून घेऊया.

अमेरिकन बाजारात मोठी खळबळ

केवळ भारतीय बाजारच नाही, तर अमेरिकन बाजारातही मोठी घसरण दिसून आली आहे. Dow Jones ते S&P यांसारख्या शेअर्समध्ये या वर्षातील सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली. S&P 500 निर्देशांक २.६४ टक्क्यांनी घसरून ७,३८३.७४ वर बंद झाला; १० ऑक्टोबर २०२५ नंतरची ही एका दिवसातील सर्वात मोठी घसरण ठरली आहे.

टेक शेअरवाले ‘नॅस्डॅक कंपोझिट’मध्ये ४.१८% ची मोठी घसरण होऊन तो २५,७०९.४३ अंकांवर बंद झाला. एप्रिल २०२५ नंतरची ही या निर्देशांकातील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण ठरली आहे. त्याच वेळी, ‘डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज’मध्येही १.३५% ची घसरण झाली आणि तो ५०,८६६.७८ अंकांवर बंद झाला.

इतकी मोठी घसरण कशामुळे?

AI आणि टेक स्टॉक्समधील मोठ्या विक्रीमुळे अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. आता, सोमवारी भारतीय बाजारातही अशाच मोठ्या घसरणीची चिन्हे दिसू लागली आहेत. या घसरणीमागे अमेरिकी जॉब डेटा हे प्रमुख कारण आहे.
मे महिन्यातील अमेरिकेची रोजगारविषयक आकडेवारी अपेक्षेपेक्षा चांगली आल्याने, यावर्षी फेडरल व्याजदरात वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. डिसेंबरपर्यंत फेडचा दर २५ बेसिस पॉइंट्सने वाढू शकतो आणि त्यानंतर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरवाढीमुळे महागाईबद्दल चिंता वाढते, ज्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्था आणि कंपन्यांच्या नफ्यावर होऊ शकतो. याच अपेक्षेमुळे शेअर बाजारात मोठी विक्री झाली आहे.

ट्रेझरी यील्ड्समध्ये वाढ

आक्रमक भूमिकेच्या भीतीमुळे, अमेरिकन ट्रेझरी यील्ड्स वाढले आहेत. बाँडच्या किमती आणि यील्ड्स विरुद्ध दिशेने जातात; शुक्रवारी बाँडच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूक कमी झाली, ज्यामुळे इक्विटीवर दबाव आला.

(टीप: शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.)

Crypto बाजारात भूकंप! 8 महिन्यांत किंमत झाली अर्धी; गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण, आता काय होणार?

Web Title: Us stock market crash impact on indian share market marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • America
  • Artificial intelligence
  • Business News
  • Marathi News
  • NIFTY 50
  • Repo Rate
  • share market

संबंधित बातम्या

MiddleEast : ट्रम्पचा मोठा डाव, सौदी होणार अणुशक्ती?
1

MiddleEast : ट्रम्पचा मोठा डाव, सौदी होणार अणुशक्ती?

Petrol-Diesel Rate: महागाईचा उडणार भडका, पेट्रोल आणि डिझेलचे दर कडाडणार; कच्च्या तेलाचा भाव 91 डॉलरच्या पार
2

Petrol-Diesel Rate: महागाईचा उडणार भडका, पेट्रोल आणि डिझेलचे दर कडाडणार; कच्च्या तेलाचा भाव 91 डॉलरच्या पार

IND vs ZIM: टीम इंडियाचा जिम्बाब्वे दौरा; पण तिथे खिशात किती रुपये लागतील? भारतीय रुपया मजबूत की कमकुवत?
3

IND vs ZIM: टीम इंडियाचा जिम्बाब्वे दौरा; पण तिथे खिशात किती रुपये लागतील? भारतीय रुपया मजबूत की कमकुवत?

आता बिलिंग, GST भरणे होणार सोपं! MSME साठी इंडियामार्ट उपकंपनीचा मोठा निर्णय, AI -आधारित अकाउंटिंग प्लॅटफॉर्म लाँच
4

आता बिलिंग, GST भरणे होणार सोपं! MSME साठी इंडियामार्ट उपकंपनीचा मोठा निर्णय, AI -आधारित अकाउंटिंग प्लॅटफॉर्म लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.