Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सौर ऊर्जेत भारताची मोठी भरारी! Vikram Solar ने दोन वर्षांत दुप्पट केली क्षमता; ३९ देशांमध्ये ‘Made In India’चा डंका

विक्रम सोलर या भारतातील आघाडीच्‍या सोलर पीव्ही मॉड्यूल उत्‍पादक कंपनीने जगभरात एकूण १० गिगावॅट सौर मॉड्यूल क्षमतेचा टप्पा ओलांडला आहे. कंपनीच्या प्रगतीमधील हे महत्त्वाचे संपादन आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 14, 2026 | 02:51 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भारतातील ५० लाखांहून अधिक घरांना ऊर्जा पुरवठा
  • 2 वर्षांत क्षमता ५ गिगावॅटवरून १० गिगावॅटवर
  • ३९ देशांमध्ये १.५ गिगावॅटची निर्यात
Vikram Solar Reaches 10 gw Milestone : विक्रम सोलर या भारतातील आघाडीच्‍या सोलर पीव्ही मॉड्यूल उत्‍पादक कंपनीने जगभरात एकूण १० गिगावॅट सौर मॉड्यूल क्षमतेचा टप्पा ओलांडला आहे. कंपनीच्या प्रगतीमधील हे महत्त्वाचे संपादन आहे, ज्‍यासह कंपनीने जागतिक स्वच्छ ऊर्जा संक्रमणामध्ये आपली भूमिका अधिक प्रबळ केली आहे. या यशाचे महत्त्व सांगायचे झाले तर, विक्रम सोलरने जगभरात बसवलेले १० गिगावॅट क्षमतेचे सौर मॉड्यूल्स हे २५ दशलक्षहून अधिक मॉड्यूल्स इतके आहेत. ही क्षमता भारतातील ५ दशलक्षहून अधिक घरांना वीज पुरवण्यासाठी पुरेशी आहे. विशेष म्हणजे, कंपनीने आपली एकूण क्षमता ५ गिगावॅटवरून अवघ्‍या दोन वर्षांमध्‍ये दुपटीने वाढवून १० गिगावॅटपर्यंत वाढवली आहे. यामधून गेल्या दोन दशकांपासून निर्माण केलेली विश्वासार्हता आणि सौर ऊर्जेची वेगाने वाढणारी मागणी दिसून येते.

SBI चा ग्राहकांना Alert! तुमचा Bank Balance होऊ शकतो झिरो; YONO App वापरत असाल तर वेळीच सावध व्हा

गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय प्रगती

भारतातील सौर क्षेत्राने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय प्रगती केली आहे, विक्रमी वेगाने वाढत आता १५० गिगावॅट क्षमतेचा टप्पा यशस्वीपणे ओलांडला आहे. या परिवर्तनामध्ये विक्रम सोलरने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जवळपास दोन दशकांचे उत्पादन कौशल्य आणि अंमलबजावणीतील अनुभवाच्या जोरावर कंपनीने मोठ्या प्रमाणावर उच्‍च-कार्यक्षम सौर उपाय उपलब्ध करून दिले आहेत.

३९ देशांमध्ये आपली उपस्थिती निर्माण केली

यातील बहुतांश प्रकल्प भारतात असले तरी, विक्रम सोलरने जागतिक स्तरावरही आपली उपस्थिती सातत्याने वाढवली आहे. जवळपास १.५ गिगावॅटच्या निर्यातीसह कंपनीने ३९ देशांमध्ये आपली उपस्थिती निर्माण केली आहे. हे यश कंपनीला जागतिक उत्पादकांच्या निवडक गटामध्ये स्थान मिळवून देते, ज्यांचा विस्तार भारताबाहेर देखील मोठ्या प्रमाणात आहे. तसेच, या यशामधून स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला आकार देण्यात कंपनीची वाढती भूमिका दिसून येते.

कंपनी तंत्रज्ञान स्वीकारण्यात नेहमी अग्रस्थानी

विक्रम सोलरच्या नाविन्यपूर्ण वारशामुळे आणि या क्षेत्रातील नेतृत्वामुळे हा टप्पा अधिक महत्त्वपूर्ण ठरला आहे. कोचीनमध्ये जगातील पहिले पूर्णतः सौर उर्जेवर चालणारे विमानतळ उभारण्यापासून भारतातील सुरुवातीच्या फ्लोटिंग सोलर प्रकल्पांपर्यंत ही कंपनी तंत्रज्ञान स्वीकारण्यात नेहमी अग्रस्थानी राहिली आहे. ब्‍लूमबर्ग एनईएफच्या टियर १ यादीत मिळालेले स्थान, सलग अनेक वर्षे किवा पीव्‍हीईएल (KIWA PVEL) मॉड्यूल रिलायबिलिटी स्कोरकार्डमध्ये मिळालेली मान्यता आणि इकोव्‍हॅडिसचे ‘प्लॅटिनम’ रेटिंग या सर्वांमधून कंपनीची गुणवत्ता, विश्वासार्हता आणि शाश्वततेप्रती कटिबद्धता दिसून येते. हाफ-कट सेल्स सारखे नेक्‍स्‍ट-जनेरशन मॉड्यूल तंत्रज्ञान भारतात सादर करणाऱ्या सुरुवातीच्या कंपन्यांमध्ये विक्रम सोलरचा समावेश आहे, ज्‍यामधून त्यांच्या कार्यक्षमता आणि गुणवत्तेवर असलेले लक्ष दिसून येते.

पॉवरहाईव्हच्या माध्यमातून ऊर्जा साठवणूक क्षेत्रातही विस्तार

विक्रम सोलरने पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये मिळून ९.५ गिगावॅट क्षमतेची मॉड्यूल निर्मिती केंद्रे उभारली आहेत. यामध्ये तामिळनाडूतील वल्लम येथील ५ गिगावॅटचा प्रकल्प त्याच्या प्रगत ऑटोमेशन आणि अत्याधुनिक उत्पादन यंत्रणांसाठी ओळखला जातो. आपल्या बॅकवर्ड इंटिग्रेशन धोरणाचा भाग म्हणून, गंगाकोंडन येथील प्रकल्पाचा विस्तार करून त्याची क्षमता ६ गिगावॅट मॉड्यूल आणि १२ गिगावॅट सेल निर्मितीपर्यंत नेण्यात येणार आहे. कंपनी व्‍हीएसएल पॉवरहाईव्हच्या माध्यमातून ऊर्जा साठवणूक क्षेत्रातही विस्तार करत आहे. आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत ५ गिगावॅट-तास (जीडब्‍ल्‍यूएच) क्षमतेचा बीईएसएस प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. तसेच, निवासी आणि मोबिलिटी बॅकअप सोल्यूशन्ससाठी कंपनीचा वीयॉन (VION) हा लिथियम बॅटरी ब्रँड कार्यरत आहे.

१० गिगावॅट क्षमतेचा टप्पा ओलांडणे हा विक्रम

विक्रम सोलरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. ज्ञानेश चौधरी म्हणाले, “१० गिगावॅट क्षमतेचा टप्पा ओलांडणे हा विक्रम सोलरसाठी अभिमानाचा क्षण आहे, तसेच या टप्‍प्‍यामधून सौर ऊर्जा जागतिक ऊर्जा क्षेत्राला वेगाने मिळत असलेला आकार दिसून येतो. आमच्या प्रगतीच्या पुढील अध्यायात प्रवेश करताना उच्‍च-कार्यक्षम तंत्रज्ञानाचा विकास, उत्पादन क्षमता मजबूत करणे आणि बॅकवर्ड इंटिग्रेशन सखोल करणे यांवर आमचा भर कायम राहील. यामुळे आम्हाला जागतिक ऊर्जा संक्रमणासाठी आवश्यक असणारे मोठे प्रमाण, स्थिरता आणि विश्वासार्हता यामध्ये अर्थपूर्ण योगदान देता येईल.”

मुख्यमंत्री फडणविसांच्या हस्ते होणार चितळे बंधू मिठाईवाले यांच्या ‘रांजे व्हिजन पार्क’चे उद्घाटन

Web Title: Vikram solar reaches 10 gw milestone amid renewable push marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • share market
  • solar energy
  • solar power
  • Solar Project
  • Stock market

संबंधित बातम्या

Bandhu Marathi Movie: दोन भाऊ, दोन जोड्या अन् नात्यांची भावनिक गुंफण! ‘बंधू’ची कथा मनाला भिडणार
1

Bandhu Marathi Movie: दोन भाऊ, दोन जोड्या अन् नात्यांची भावनिक गुंफण! ‘बंधू’ची कथा मनाला भिडणार

Premayan Web Series: प्रेम, प्रतिष्ठा अन् सूडाचा खेळ! भिमराव मुडे यांची ‘प्रेमायण’ वेबसिरीज येतेय STAGE OTT वर
2

Premayan Web Series: प्रेम, प्रतिष्ठा अन् सूडाचा खेळ! भिमराव मुडे यांची ‘प्रेमायण’ वेबसिरीज येतेय STAGE OTT वर

PFRDA Pune NPS News: पुण्यात ‘एनपीएस’चा मोठा डंका!; १२,१७१ कोटींची मालमत्ता जमा, PFRDA चे सदस्य संजय पांडेंची माहिती
3

PFRDA Pune NPS News: पुण्यात ‘एनपीएस’चा मोठा डंका!; १२,१७१ कोटींची मालमत्ता जमा, PFRDA चे सदस्य संजय पांडेंची माहिती

Ambabai Chhand Tuza Lagala: आई अंबाबाईच्या भक्तीत रंगवणारं ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
4

Ambabai Chhand Tuza Lagala: आई अंबाबाईच्या भक्तीत रंगवणारं ‘अंबाबाई छंद तुझा लागला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.