ऑस्ट्रेलियाचा ओमानवर ९ विकेट्सने विजय(फोटो-सोशल मीडिया)
Australia vs Oman, T20 World Cup 2026 : आज टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आज ४० व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि ओमान हे संघ आमनेसामने आले होते. पल्लेकेले येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ओमानचा ९ विकेट्सने पराभव केला. टॉस गमावून ओमान संघाने प्रथम फलंदाजी करत १६.२ षटकात १०४ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात ऑस्ट्रेलिया संघाने हे लक्ष्य कर्णधार मिचेल मार्शच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर ९.४ षटकातच पूर्ण केले. या विजयासह ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या मोहिमेचा शेवट गोड केला. ओमानकडून शकील अहमदने एकमेव एक विकेट घेतली.
या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि ओमान यांच्यातील सामन्यात(टी-२० विश्वचषक २०२६ )मिचेल मार्शने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर ओमान संघाला फलंदाजीसाथी आमंत्रित केले. ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय योग्य ठरला. कारण, ओमान संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाच्या एक धावेवर त्यांचा सलामीवर आमीर कलीम बाद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी ओमानच्या फलंदाजांना एकही संधि दिली नाही. ओमानकडून वसिम अली या एकमेव फलंदाजाने सर्वाधिक ३२ धावा केल्या. कर्णधार जतिंदर सिंग १७ धावा, करण सोनावले १२ धावा, हम्माद मिर्झा १६ धावा, मोहम्मद नदीम २ धावा, विनायक शुक्ला ९ धावा, जितेन रामानंदी १ धाव आणि शफीक जान जय ० धावा करून बाद झाले, तर ओडेद्रा ४ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून ॲडम झाम्पाने ३.२ षटकात २१ धावा देत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. झेवियर बार्टलेट आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर नॅथन एलिस आणि मार्कस स्टॉइनिस यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
ओमान संघाने दिलेल्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड या सलामीवीरांनी ८.१ षटकातच ९३ धावांची भागीदारी रचून संघाचा विजय सोपा केला. हेड १९ चेंडूत ३२ धावा करून बाद झाला. तर मार्शने ३३ चेंडूत नाबाद ६४ धावा केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ४ षटकार मारले. तर जोश इंग्लिस १२ धावांवर नाबाद राहिला. ओमानकडून शकील अहमदने एकमेव एक विकेट घेतली.
ओमान प्लेइंग इलेव्हन: आमिर कलीम, जतिंदर सिंग (क), करण सोनावले, हम्माद मिर्झा, वसीम अली, मोहम्मद नदीम, विनायक शुक्ला (डब्ल्यू), जितेन रामानंदी, जय ओडेद्रा, शकील अहमद, शफीक जान
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : मिचेल मार्श (क), ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड, जोश इंग्लिस (डब्ल्यू), मॅट रेनशॉ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा






