फोटो सौजन्य: Pinterest
आकाराच्या बाबतीत MG Majestor ही Toyota Fortuner पेक्षा लक्षणीय मोठी आहे. Majestor ही Fortuner पेक्षा सुमारे 251 मिमी लांब, 161 मिमी रुंद आणि 41 मिमी उंच आहे. तिचा व्हीलबेस देखील 205 मिमीने अधिक लांब आहे. त्यामुळे मॅजेस्टरमध्ये अधिक प्रशस्त केबिन आणि तिसऱ्या रांगेतील प्रवाशांना अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. रोड प्रेझेन्सच्या दृष्टीनेही मॅजेस्टर अधिक भक्कम आणि प्रभावी वाटते. त्यामुळे आकाराच्या बाबतीत मॅजेस्टर आघाडीवर दिसते.
MG Majestor मध्ये 2.0 लिटर ट्विन-टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले आहे, जे 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. हे इंजिन अंदाजे 215 ते 218 बीएचपी पॉवर आणि 478 ते 480 एनएम टॉर्क निर्माण करते. तर दुसरीकडे Toyota Fortuner मध्ये 2.7 लिटर पेट्रोल इंजिन (मॅन्युअल गिअरबॉक्ससह) आणि 2.8 लिटर डिझेल इंजिन (ऑटोमॅटिक व्हर्जनमध्ये) उपलब्ध आहे. डिझेल इंजिन सुमारे 201 बीएचपी पॉवर आणि 500 एनएम टॉर्क देते.
पॉवरच्या बाबतीत मॅजेस्टर थोडी पुढे दिसते, तर टॉर्कच्या बाबतीत फॉर्च्युनरचे डिझेल इंजिन अधिक ताकदवान आहे. दोन्ही SUV दमदार ऑफ-रोडिंग क्षमतेसह येतात.
Toyota Fortuner मध्ये 7 एअरबॅग्स, ईएससी, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल असिस्ट, डाउनहिल असिस्ट, डिफरेंशियल लॉक आणि पार्किंग सेन्सर्ससारखी आवश्यक सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत. MG Majestor मध्ये मात्र लेव्हल-2 ADAS सिस्टम देण्यात आली आहे. यामध्ये लेन कीपिंग असिस्ट, अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंगसारख्या आधुनिक सुविधा आहेत. तंत्रज्ञानाच्या बाबतीत Majestor अधिक प्रगत वाटते.
जर तुम्हाला मोठी साइझ, प्रशस्त केबिन आणि आधुनिक सेफ्टी फीचर्स असलेली SUV हवी असेल तर MG Majestor ही एक उत्तम पर्याय ठरू शकते. मात्र, मजबूत ब्रँड इमेज, जास्त टॉर्क आणि विश्वासार्हता महत्त्वाची वाटत असेल तर Toyota Fortuner आजही एक चांगला पर्याय आहे.






