Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI Digital Rupee: इंटरनेट आणि बँक खात्याशिवाय होणार व्यवहार! काय आहे RBI चा ‘डिजिटल रुपया’? UPI पेक्षा कसा आहे भारी?

UPI द्वारे काही सेकंदात पैसे हस्तांतरित करतात. पण UPI च्या जगात आता आणखी एका शब्दाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे: डिजिटल रुपया. बऱ्याच लोकांना वाटते की डिजिटल रुपया आणि UPI चा एक भाग आहे, पण तसं नाही. जरी दोन्ही डिजिटल पेमेंटसाठी वापरले जात असले तरी, त्यांच्या कार्यपद्धती पूर्णपणे वेगळ्या आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 14, 2026 | 05:23 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • इंटरनेट आणि बँक खात्याशिवाय होणार व्यवहार!
  • काय आहे RBI चा ‘डिजिटल रुपया’?
  • UPI पेक्षा कसा आहे भारी?
RBI Digital Rupee: भारतातील लोक डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. बहुतेकजण तर आता कॅश ठेवतच नाही. UPI ची इतकी सवय झाली आहे की काहीही पेमेंट करायचं असेल तरीही UPI द्वारे काही सेकंदात पैसे हस्तांतरित करतात. पण UPI च्या जगात आता आणखी एका शब्दाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे: डिजिटल रुपया. बऱ्याच लोकांना वाटते की डिजिटल रुपया आणि UPI चा एक भाग आहे, पण तसं नाही. जरी दोन्ही डिजिटल पेमेंटसाठी वापरले जात असले तरी, त्यांच्या कार्यपद्धती पूर्णपणे वेगळ्या आहेत. जर तुम्हालाही डिजिटल रुपया वापरायचा असेल, तर डिजिटल रुपया काय आहे आणि तो UPI पेक्षा कसा वेगळा आहे, हे येथे जाणून घेणं आवश्यक आहे.

ना ग्राहक येणार, ना काउंटर लागणार! तरीही लाखो रुपयांची कमाई; तुम्हीही सुरु करु शकता Blinkit, Zepto चा ‘डार्क स्टोअर’ बिझनेस

डिजिटल रुपया म्हणजे काय?

डिजिटल रुपया हे भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेले एक मध्यवर्ती बँकेचे डिजिटल चलन आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, हे रोख रुपयांचे डिजिटल स्वरूप आहे. जसे तुमच्याकडे १०० रुपयांची नोट असते, त्याचप्रमाणे डिजिटल रुपया देखील १०० रुपयांच्या बरोबरीचा असतो. फरक फक्त एवढाच आहे की तो मोबाईल ॲप किंवा डिजिटल वॉलेटमध्ये साठवलेला असणार आहे.

UPI आणि डिजिटल रुपयामध्ये काय फरक आहे?

आता, UPI आणि डिजिटल रुपयामधील फरकाबद्दल बोलायचं तर हा फरक सर्वात मोठा आहे की UPI ही एक पेमेंट सिस्टिम आहे, तर डिजिटल चलन हे स्वतः एक चलन आहे. जेव्हा तुम्ही UPI वापरून कोणाला पैसे पाठवता, तेव्हा पैसे तुमच्या बँक खात्यातून दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात जातात. पण डिजिटल चलनामध्ये, पैसे तुमच्या बँक खात्यातून डिजिटल वॉलेटमध्ये येतात आणि नंतर तिथून दुसऱ्या व्यक्तीच्या डिजिटल वॉलेटमध्ये दिले जातात. हे रोख व्यवहारासारखंच आहे फक्त डिजिटल अंदाजात आहे.

नेमकी ही प्रणाली कशी काम करते?

डिजिटल चलन वापरण्यासाठी, तुम्हाला या RBI प्रकल्पाशी संलग्न असलेल्या बँकेचे डिजिटल चलन वॉलेट आवश्यक आहे. तुमच्या बँक खात्यातून वॉलेटमध्ये डिजिटल चलन लोड केले जाते. यानंतर, QR कोड स्कॅन करून किंवा थेट दुसऱ्या वॉलेटमध्ये डिजिटल चलन पाठवता येते.

या प्रक्रियेत काय रिस्क आहे?

डिजिटल चलन बरेच सुरक्षित आहे, पण याचा अर्थ असा नाही की ते पूर्णपणे धोकारहित आहे. तुमचा मोबाईल फोन आणि पाकीट हरवणे ही एक समस्या असू शकते.

आधीच महागाई त्यात पेंटचेही किंमती महागले! Asian Paints च्या दरात 12 टक्क्यांची वाढ; बजेटवर होणार मोठा परिणाम

Web Title: What is the rbis digital rupee how is it superior to upi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • bank RBI
  • digital
  • Digital Payment
  • Digital Transaction
  • RBI news
  • UPI
  • UPI ID
  • UPI payment

संबंधित बातम्या

Rupee vs US Dollar : एका झटक्या मजबूत झाला रुपया? RBI च्या निर्णयाचा धमाका… डॉलर बॅकफूटवर, नेमकी काय स्थिती?
1

Rupee vs US Dollar : एका झटक्या मजबूत झाला रुपया? RBI च्या निर्णयाचा धमाका… डॉलर बॅकफूटवर, नेमकी काय स्थिती?

RBI Measures To Strengthen Rupee : Dollar ची विक्री, नियम कडक करणार… रुपयाला सावरण्यासाठी RBI घेणार कोणते मोठे निर्णय?
2

RBI Measures To Strengthen Rupee : Dollar ची विक्री, नियम कडक करणार… रुपयाला सावरण्यासाठी RBI घेणार कोणते मोठे निर्णय?

एका क्लिकवर गमावू शकता कष्टाची कमाई! Digital Assets मध्ये गुंतवणूक करताना भामट्यांपासून सावध राहण्यासाठी या टिप्स फॉलो करा
3

एका क्लिकवर गमावू शकता कष्टाची कमाई! Digital Assets मध्ये गुंतवणूक करताना भामट्यांपासून सावध राहण्यासाठी या टिप्स फॉलो करा

DIKSHA Portal: डिजिटल शिक्षणाचे वरदान! पंतप्रधान मोदींनी सांगितले, ‘या’ प्लॅटफॉर्मचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व’
4

DIKSHA Portal: डिजिटल शिक्षणाचे वरदान! पंतप्रधान मोदींनी सांगितले, ‘या’ प्लॅटफॉर्मचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.