Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UDISE नोंदणीची धक्कादायक आकडेवारी! महाराष्ट्रातील तब्बल 394 शाळांचे वर्ग रिकामे, विद्यार्थ्यांची वानवा

Maharashtra Schools Zero Enrollment : यु-डायस प्लस नोंदणीच्या आकडेवारीतून राज्यातील शाळांचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. आता शाळा आहेत परंतु शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी नाही...

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 03, 2025 | 12:11 PM
महाराष्ट्रातील तब्बल 394 शाळांचे वर्ग रिकामे, विद्यार्थ्यांची वानवा

महाराष्ट्रातील तब्बल 394 शाळांचे वर्ग रिकामे, विद्यार्थ्यांची वानवा

Follow Us
Close
Follow Us:

394 schools in Maharashtra have zero students : राज्यातील शाळांबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षण हे खूप महत्त्वाचे असते. शिक्षणाने माणसाला खूप काही शिकायला मिळते. प्रत्येकजण लहान असतानाच शाळेत जातो , तिथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण पुर्ण होते. मात्र आता शाळा आहेत पण शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी नाहीत असं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

‘यूडायस-प्लस’ (U-Dice Plus Registration) वरील ३० सप्टेंबरपर्यंतच्या नोंदणीच्या आकडेवारीनुसार, राज्यातील सर्व प्रकारच्या श्रेणींतील ३९४ शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्याची नोंदणी झाली नसल्याचे समोर आले आहे. सुमारे आठ हजार शाळांची पटसंख्या दहाच्याही खाली आहे.ग्रामीण भागातील शाळा रिकाम्या होत असल्याचं प्रमाण चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे.

एका बाजूला शालेय शिक्षण विभागाने (School Education Department) गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षणाची कास धरत असताना आणि शिक्षण विभागातील विविध घटक दर दिवशी नवनवीन उपक्रमांची सुरुवात करत असताना राज्यातील ग्रामीण आणि डोंगराळ, दुर्गम भागातील शाळांची परिस्थिती बिकट होत असल्याचे चित्र आहे.

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी! अगदी १८ वर्षांपासून ‘या’ वयोगटातील उमेदवार करू शकतात अर्ज

राज्यात एकूण दोन कोटी ११ लाख ८६ हजार ९४३ विद्यार्थ्यांची नोंद झाली. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे सात हजारांनी अधिक आहे. मात्र त्याचवेळी पाच लाख विद्यार्थ्यांची नोंदणी अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे विद्यार्थीसंख्या लाखोंनी वाढेल, असे संकेत असले, तरी ग्रामीण शाळा रिकाम्या होण्याचे प्रमाणही चिंताजनक आहे.आकडेवारीनुसार, पुण्यात सर्वाधिक 37 शाळांत एकाही विद्यार्थ्याची नोंद झालेली नाही.

याचबरोबर रत्नागिरीतील २४ आणि नागपूरमधील २३ शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाही. बुलढाण्यात २१ शाळा आहेत. या आकडेवारीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ७१३ शाळांची पटसंख्या 10 च्या खाली आहे. पु्ण्यात ६२७, रायगडमध्ये ६८२ आणि सिंधुदुर्गमध्ये ५६९ शाळांत एवढीच मोजकी विद्यार्थीसंख्या आहे. तर मुंबई उपनगरात ३६० शाळा, मुंबई शहरात ३४, ठाण्यात १९९ आणि पालघरमध्ये १२४ शाळा आहेत, ज्या विद्यार्थ्यांमध्ये १० जागा रिक्त आहेत त्यांची संख्या जास्त आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी २०० ते ३००, तर काही ठिकाणी १०० ते १५० शाळा अशा श्रेणीत आहेत. राज्यात एकूण सात हजार ९४६ शाळांत केवळ १ ते दहा विद्यार्थी नोंदले गेले आहेत.

कॉन्स्टेबलने घेतला अपमानाचा बदला! क्रॅक केली UPSC, बनला IPS

Web Title: 394 schools in maharashtra have zero students udise data

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 12:11 PM

Topics:  

  • maharashtra
  • School
  • Students

संबंधित बातम्या

मोठी बातमी! CUET UG परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; ११ मे ते ३१ मे दरम्यान…
1

मोठी बातमी! CUET UG परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; ११ मे ते ३१ मे दरम्यान…

“… अशा शिक्षणाचा उपयोग काय?” विद्यार्थ्यांनी परत केल्या B.Com च्या पदव्या; शासकीय नोकरीवरून पेटले वातावरण
2

“… अशा शिक्षणाचा उपयोग काय?” विद्यार्थ्यांनी परत केल्या B.Com च्या पदव्या; शासकीय नोकरीवरून पेटले वातावरण

“शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या”, ऑनलाइन कामांच्या जाचाविरोधात शिक्षकांचा एल्गार
3

“शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या”, ऑनलाइन कामांच्या जाचाविरोधात शिक्षकांचा एल्गार

Narayan Rane: मोठी बातमी! चिपळूणमधील कार्यक्रमात नारायण राणेंना आली भोवळ, कालच दिले होते निवृत्तीचे संकेत
4

Narayan Rane: मोठी बातमी! चिपळूणमधील कार्यक्रमात नारायण राणेंना आली भोवळ, कालच दिले होते निवृत्तीचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.