फोटो सौजन्य - Pinterest
आर्टीफिसिअल इंटेलिजन्स (AI)ने माणसाचे अनेक कामे सोपी केली आहेत. AI माणसाचा चांगला मित्र झाला आहे. प्रत्येक संशोधनामध्ये तसेच इतर अनेक कामांमध्ये AI माणसाच्या हातात हात देऊन ताठ उभा आहे. अनेक गोष्टींसाठी मानव AI ची मदत घेत आहे, तर AI माणसाला होईल तितकी मदत करण्यास राजी आहे. परंतु, काहींचे म्हणणे असे आहे कि, भविष्यामध्ये नवे तंत्रज्ञान AI आपला मुख्य शत्रू बनणार आहे. कारण, AI मुळे अनेक नोकऱ्या तसेच अनेकांची कामे धोक्यामध्ये आली आहेत.
अनेक कंपन्यांनी काही कामांमध्ये मानवी बळ टाळून AI च्या वापरला सुरुवातही केली आहे. त्यामुळे अनेक जणांना AI मानवाच्या शत्रूरुपी वाटत आहे. परंतु गोष्ट अशी आहे की, AI जरी हुशार असला तरी त्याला मानवाच्या हुशारीने तयार केले गेले आहे. कोणतीही गोष्ट निर्मात्याच्या पुढे कधीही जाऊ शकत नाही. मानव AI चा निर्माता आहे. AI चा परिणाम नक्कीच काही नोकऱ्यांवर जाणवेल परंतु AI अनेक नव्या नोकऱ्यांची निर्मिती केली.
हे देखील वाचा: AIESL मध्ये विशेष भरती; सरकारी क्षेत्रात कामाची उत्तम संधी, त्वरित अर्ज करा
पूर्वीच्या काळी प्रसार माध्यम म्हणजे दवंडी पिटणे तसेच भारूड, कीर्तन होते. दूरदर्शन तसेच रेडिओसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा उगमाने या जुन्या माध्यमांच्या परंपरेवर नक्कीच परिणाम जाणवला परंतु नव्या प्रसार माध्यमांनी नव्या नोकऱ्यांना चालना दिली. परिणामी, आज प्रसार माध्यमांसाठी काम करणाऱ्या लोकांची संख्या पूर्वीच्या तुलनीत फार जास्त आहे. याचाअर्थ कि नव्या तंत्रज्ञानाने नव्या नोकऱ्यांना चालना दिली. तसेच AI च्या बाबतीत आहे कि भविष्यात AI नोकरी उत्पादनाचे मुख्य केंद्रही ठरू शकते. AI हा नेहमी मानवी नियंत्रणाच्या खाली चालतो. एकंदरीत, AI मानवाच्या इशाऱ्यावर चालतो. तर तो इशारा देण्यासाठी नक्कीच कंपनींना AI स्पेशियालिस्टची गरज भासणार आणि नव्या नोकरीच्या संधीला चालना मिळणार.
जर तुम्हाला भविष्याचा विचार करता AI मध्ये करिअर घडवायचे आहे, तर तुम्हाला तुमच्या विचारांना आणखीन मजबूत करावे लागेल. तुमच्या कौशल्यांमध्ये भर टाकावी लागेल. AI मध्यही तद्न्यता मिळवण्यासाठी उमेदवारांना प्रोगॅमिक भाषा यायला हवी. उमेदवाराला जावा स्क्रिप्टची समज हवी. त्याचबरोबर कोडिंग समजणाऱ्या व्यक्तीला AI खूप चांगल्या रीतीने अभ्यासता येऊ शकते.