फोटो सोजन्य - Social Media
एअर इंडिया इंजिनीरिंग सर्विसेस लिमिटेड (AIESL)ने भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरती प्रक्रियेत सहभाग घेऊ इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून रिजनल सिक्योरिटी ऑफिसर (RSO) तसेच सिक्योरिटी विभागातील असिस्टेंट सुपरवाइजरच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जात आहे. या भरती प्रक्रियेसंबंधित AIESL ने अधिकृत अधिसूचना जाहीर केली होती.
या अधिसूचनेमध्ये भरती प्रक्रियेसंबंधित सखोल माहिती पुरवण्यात आली आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या अधिसूचनेचा आढावा घ्यावा. AIESL ने अर्ज करण्याची मुदत दिली आहे. उमेदवारांना २४ सप्टेंबर २०२४ या तारखेअगोदर अर्ज करावे लागणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आतच अर्ज करावे असे आवाहन AIESL ने केले आहे, अन्यथा अर्ज स्वीकारले जाणार नाही.
हे देखील वाचा : अमेरिकेत भारतीयांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; कोटींच्या घरात मिळणार वेतन
या भरती प्रकियेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी उमेदवारांना अर्ज करावे लागणार आहे. उमेदवारांना गुगल लिंकद्वारे अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर ऑफलाईन अर्ज करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. ऑफलाईन अर्ज फॉर्म भरल्यावर ते “चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर, एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड कार्मिक विभाग, दुसरा मजला, सीआरए बिल्डिंग, सफदरजंग एअरपोर्ट कॉम्प्लेक्स, अरबिंदो मार्ग, नवी दिल्ली – 110003” या विहित पत्त्यावर पाठवावे.
मुळात या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना पदानुसार वेतन पुरवला जाणार आहे. रिजनल सिक्योरिटी ऑफिसर (RSO)च्या पदासाठी ४७,६२५ रुपये दरमहा वेतन दिला जाणार आहे. या पदासाठी दिल्ली, हैदराबाद तसेच तिरुअनंतपूरम येथे प्रत्येकी १ जाग रिक्त आहे. तर सिक्योरिटी विभागातील असिस्टेंट सुपरवाइजरच्या ७३ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु असून नियुक्त उमेदवाराला २७,९४० रुपयांचे मासिक वेतन दिले जाईल.
हे देखील वाचा : महावाचन उत्सवासाठी एक काेटी विद्यार्थ्यांचे लक्ष्य गाठण्याचे ध्येय; मागील आठवडाभरातच 9 लाख विद्यार्थ्यांची नोंद
देशातील विविध शहरांमध्ये उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. जनरल प्रवर्गातील उमेदवारांना अर्जदरम्यान काही रक्कम भरावी लागणार आहे. अर्ज शुल्क म्हणून १००० रुपये आकारण्यात येणार आहे. एससी तसेच एसटी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे. एकंदरीत, एसटी तसेच एससी प्रवर्गातील उमेदवारांकडून एकही रुपया आकारला जणार नाही. त्यांच्यासाठी अर्जशुल्क निशुल्क आहे.