Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway Recruitment : रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! कोच अटेंडंट भरतीसाठी पात्रतेचे नियम बदलले; सविस्तर वाचा

रेल्वेमध्ये कोच अटेंडंट होण्यासाठी किमान १० वी उत्तीर्ण असणे पुरेसे होते. मात्र, आता नवीन नियमांनुसार या पदासाठीची पात्रता वाढवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेत बदल करण्यात आला आहे

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 23, 2026 | 02:05 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘कोच अटेंडंट’ या पदासाठीच्या शैक्षणिक पात्रतेत मोठा बदल
  • हा निर्णय का घेण्यात आला?
  • कोच अटेंडंटची भरती कशी होते?
Railway Recruitment : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवणे देशातील लाखो तरुणांचे स्वप्न असतं. रेल्वेतील विविध पदांसाठी वेळोवेळी भरती प्रक्रिया राबवली जाते. मात्र, आता रेल्वे बोर्डाने ‘कोच अटेंडंट’ या महत्त्वाच्या पदासाठीच्या शैक्षणिक पात्रतेत मोठा बदल केला आहे. प्रवाशांना मिळणाऱ्या सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

सैनिक शाळांमध्ये आता तंत्रज्ञानाचे धडे; अभ्यासक्रमात समाविष्ट होणार AI आणि डेटा सायन्स!

काय झाला आहे नेमका बदल?

यापूर्वी रेल्वेमध्ये कोच अटेंडंट होण्यासाठी किमान १० वी उत्तीर्ण असणे पुरेसे होते. मात्र, आता नवीन नियमांनुसार या पदासाठीची पात्रता वाढवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेत बदल करण्यात आला आहे आता केवळ १२ वी उत्तीर्ण उमेदवारच या पदासाठी अर्ज करू शकतील. या पदासाठी तांत्रिक पात्रतादेखील आवश्यक आहे. १२ वी सोबतच उमेदवाराकडे ITI (आयटीआय) प्रमाणपत्र असणं अनिवार्य करण्यात आलं आहे. त्याचसोबत विशेष प्रशिक्षणदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. उमेदवाराने हाऊसकीपिंगशी संबंधित किमान ३ महिन्यांचे प्रशिक्षण (Training) घेतलेले असणं आवश्यक आहे.

हा निर्णय का घेण्यात आला?

रेल्वे बोर्डाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे संचालक लव कुमार यांनी सर्व रेल्वे झोनच्या महाप्रबंधकांना पत्र पाठवून ही नवीन व्यवस्था लागू करण्याचे आदेश दिले आहेत. यामागील मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

१. सेवेचा दर्जा सुधारणे: १० वी पास पात्रता असताना अनेकदा प्रवाशांकडून सेवेच्या गुणवत्तेबाबत तक्रारी येत होत्या. पात्रता वाढवल्यामुळे अधिक सक्षम कर्मचारी मिळतील. इतर स्कील्स आवश्यक असल्याने त्याचाही सेवेत फरक जाणवेल.
२. आधुनिक गाड्यांचे आव्हान: सध्या भारतीय रेल्वे ‘नमो भारत’ आणि ‘अमृत भारत’ सारख्या प्रगत गाड्या चालवत आहे. या गाड्यांमधील प्रवाशांच्या अपेक्षा जास्त असतात, त्या पूर्ण करण्यासाठी तांत्रिक समज असलेले कर्मचारी आवश्यक आहेत.
३. तांत्रिक कामात मदत: आयटीआय अनिवार्य केल्यामुळे कोच अटेंडंट आता डब्यातील लाईट, सीट किंवा इतर उपकरणांमधील छोटे-मोठे तांत्रिक बिघाड स्वतः दुरुस्त करू शकतील. त्यामुळे या गोष्टींचा विचार करुन हे बदल करण्यात आले आहेत.

कोच अटेंडंटची भरती कशी होते?

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोच अटेंडंटची भरती थेट रेल्वेमार्फत केली जात नाही. यासाठी रेल्वे खाजगी एजन्सींची (Private Agencies) मदत घेते. मात्र, आता या एजन्सींनाही नवीन नियमांनुसार १२ वी पास आणि आयटीआय असलेल्या उमेदवारांचीच निवड करावी लागणार आहे. नवीन धोरणानुसार, कोच अटेंडंट आता केवळ सेवा देणारे कर्मचारी नसून ते आपल्या डब्यात एका ‘सुपरवायझर’च्या भूमिकेत असतील. प्रवाशांच्या समस्या समजून घेऊन त्या त्वरित सोडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. त्यामुळे ही एक जबाबदारी असणार आहे.

Military School मध्ये कसा मिळतो प्रवेश? या शाळेत शिकू शकतात का सामान्य माणसांची मुलं, वाचा माहिती

Web Title: A golden opportunity for a job in the railways eligibility criteria for coach attendant recruitment revised read for details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • Career News
  • Indian Railway
  • job news

संबंधित बातम्या

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
1

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!
2

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
3

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.