Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंट’ आणि ‘सिनेमॅटोग्राफी’; क्षेत्र वेगळे पण संधी अफाट! तुम्हाला कशात करायचंय Career?

आजच्या काळात तरुण पारंपरिक करिअरच्या चौकटीबाहेर जाऊन नव्या क्षेत्रांकडे वळत आहेत. एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंटमध्ये विमानसेवा क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या सांभाळण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 10, 2026 | 07:51 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

आजच्या काळात पारंपरिक करिअर पर्यायांपलीकडे जाऊन तरुण वेगवेगळ्या क्षेत्रांकडे आकर्षित होत आहेत. त्यामध्ये एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंट आणि सिनेमॅटोग्राफी ही दोन क्षेत्रे सध्या विशेष चर्चेत आहेत. दोन्ही क्षेत्रांत करिअरच्या भरपूर संधी असून योग्य शिक्षण, कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर उज्ज्वल भविष्य घडवता येऊ शकते.

Best OF Luck विद्यार्थ्यांनो! आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात; १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार

एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंट : आकाशात उंच भरारी

विमानसेवा क्षेत्र झपाट्याने विस्तारत असून त्यामागे एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंट तज्ज्ञांची मोठी भूमिका असते. या अभ्यासक्रमातून एअरलाईन मॅनेजर, एअर ट्रॅफिक कंट्रोल, सिस्टिम मॅनेजर, विमानतळ व्यवस्थापक, विमानतळ सुरक्षा अधिकारी, एअरक्राफ्ट ऑपरेटर अशा विविध पदांवर काम करण्याची संधी मिळते. या कोर्ससाठी किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून गणित व इंग्रजी विषयांचे ज्ञान महत्त्वाचे मानले जाते. काही संस्थांमध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाते, तर काही ठिकाणी गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना एअरलाईन ऑपरेशन्स, सेफ्टी मॅनेजमेंट, एअरपोर्ट प्लॅनिंग, कस्टमर हँडलिंग यांचे प्रशिक्षण दिले जाते. कोर्स पूर्ण केल्यानंतर देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात.

सिनेमॅटोग्राफी : कॅमेऱ्यामागचा जादूगार

चित्रपट म्हणजे केवळ कलाकारांचा अभिनय नव्हे, तर त्या प्रत्येक फ्रेममागे सिनेमॅटोग्राफरची मेहनत असते. सिनेमॅटोग्राफी म्हणजे कॅमेऱ्याद्वारे कथा प्रभावीपणे मांडण्याची कला. प्रकाशयोजना, फ्रेमिंग, कॅमेरा अँगल, लेन्सचा वापर, रंगछटा या सगळ्या गोष्टी सिनेमॅटोग्राफर ठरवतो. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी १० वी किंवा १२ वी नंतर डिप्लोमा, प्रमाणपत्र किंवा पदवी अभ्यासक्रम करता येतो. सुरुवातीला असिस्टंट म्हणून काम करत अनुभव मिळवणे खूप महत्त्वाचे असते. मेहनत, सातत्य आणि सर्जनशील दृष्टिकोन असेल तर चित्रपट, वेब सिरीज, जाहिराती, माहितीपट अशा विविध माध्यमांत काम करण्याची संधी मिळते.

मुंबई मेट्रो भरतीसाठी करा अर्ज! विविध पदासाठी भरती; ₹2.80 लाखांपर्यंत पगाराची संधी

प्रवेश प्रक्रिया आणि संस्थांची भूमिका

दोन्ही क्षेत्रांत प्रवेशासाठी काही संस्थांमध्ये प्रवेश परीक्षा, मुलाखत किंवा गुणवत्तेच्या आधारे निवड केली जाते. प्रवेशानंतर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाते, जे त्यांच्या करिअरसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता, दिल्ली यांसारख्या शहरांमध्ये या अभ्यासक्रमांसाठी नामांकित संस्था उपलब्ध आहेत. एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंट आणि सिनेमॅटोग्राफी ही दोन्ही क्षेत्रे मेहनती आणि कौशल्यवान तरुणांसाठी मोठ्या संधी घेऊन आली आहेत. पारंपरिक चौकटीत अडकून न राहता आवड, क्षमता आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर या क्षेत्रांत यशस्वी करिअर घडवता येऊ शकते. योग्य निर्णय घेतला तर हे करिअर केवळ नोकरीच नव्हे, तर ओळख आणि समाधानही देऊ शकते.

Web Title: Air travel management and cinematography career in tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 07:51 PM

Topics:  

  • Career
  • Career News

संबंधित बातम्या

राज्यात एमसीएच्या दुसऱ्या यादीत ७ हजार ४०७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी; ६,३२७ जणांना पसंतीचे कॉलेज
1

राज्यात एमसीएच्या दुसऱ्या यादीत ७ हजार ४०७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी; ६,३२७ जणांना पसंतीचे कॉलेज

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी
2

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी

Law Admission 2026-27: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 232 नव्या विधी महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश
3

Law Admission 2026-27: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 232 नव्या विधी महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश

IIT Delhi AI Course: AI क्षेत्रात करिअरची संधी! IIT Delhiच्या नव्या कोर्सेससाठी असा करा अर्ज
4

IIT Delhi AI Course: AI क्षेत्रात करिअरची संधी! IIT Delhiच्या नव्या कोर्सेससाठी असा करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.