SPJIMR पीजीपीडीएम बॅच 27 साठी अर्ज कसा करावा
भारतीय विद्या भवनच्या एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (एसपीजेआयएमआर)ने फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत असलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन डेव्हलपमेंट मॅनेजमेंट (Post Graduate Programme in Development Management) (पीजीपीडीएम)च्या बॅच २७ – क्लास ऑफ २०२७ साठी अर्जप्रक्रिया सुरू केली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ईक्यूयूआयएस, एएसीएसबी व एएमबीएद्वारे मान्यताकृत भारतातील एकमेव डेव्हलपमेंट मॅनेजमेंट प्रोग्राम पीजीपीडीएममध्ये शैक्षणिक उत्कृष्टतेसह व्यावहारिक अध्ययनाचे संयोजन आहे, जो सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी डिझाइन करण्यात आला आहे.
SPJIMR ने पटकावले फायनान्शियल टाइम्स ग्लोबल रँकिंगमध्ये प्रथम स्थान; मिळाला टॉप बिझनेस स्कुलचा दर्जा
काय आहे हेतू?
”सामाजिक क्षेत्र विकसित होत असताना त्यामधील प्रमुख देखील अधिक क्षमतापूर्ण झाले पाहिजेत. पीजीपीडीएम व्यावसायिकांना आवडीसह, तसेच आर्थिकपासून प्रशासनापर्यंत धोरणात्मक व्यवस्थापन साधनांसह देखील सुसज्ज करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे, जो हेतूला विकासात्मक, शाश्वत प्रभावामध्ये रूपांतरित करतो. आम्ही उमेदवारांना सामाजिक परिवर्तनाच्या भावी लाटेचे नेतृत्व करण्यास सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत,” असे एसपीजेआयएमआरच्या पीजीपीडीएमचे अध्यक्ष प्रोफेसर तनोजकुमार मेश्राम म्हणाले.
कसा आहे अभ्यासक्रम
भारतात सीएसआर निधी झपाट्याने वाढत असताना सामाजिक क्षेत्रात कुशल टॅलेंटसाठी मागणी अभूतपूर्वरित्या वाढली आहे. एसजीजेआयएमआरचा पीजीपीडीएम अभ्यासक्रम एनजीओ व सामाजिक उद्योगांमध्ये मुख्य व्यवस्थापन कौशल्य आणत या तफावतीला दूर करतो. हा अभ्यासक्रम परिसंस्थेला चालना देतो, जेथे कॉर्पोरेट संसाधने व सामाजिक मोहिमा एकत्र येत भारतातील विकासाशी संबंधित सर्वात प्रचलित आव्हानांचे निराकरण करतात.
२०११ मध्ये सुरू झाल्यापासून पीजीपीडीएमने भारतातील २८ राज्यांमधील ४१७ हून अधिक संस्थांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव घडवून आणला आहे. पीजीपीडीएमचे माजी विद्यार्थी संस्थापक, प्रमुख, विश्वस्त, संचालक आणि एनजीओंचे प्रमुख, तसेच सामाजिक उद्योजक, सीएसआर व्यवस्थापक, प्रोग्राम अधिकारी आणि सल्लागार या पदांवर आहेत, जे सामाजिक क्षेत्रामध्ये परिवर्तनाला चालना देत आहेत.
कसे आहे सत्रांचे आयोजन
हा १२ महिन्यांचा मॉड्युलर प्रोग्राम सहा संपर्क कालावधीदरम्यान ३२ अभ्यासक्रम देतो, ज्यामध्ये क्लासरूम व ऑनलाइन शिक्षणाचा समावेश आहे. संकरित संरचना सहभागी विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकास आणि कामाप्रती कटिबद्धता यांमध्ये संतुलन राखण्याची सुविधा देते, जेथे एसपीजेआयएमआरच्या मुंबई कॅम्पसमध्ये पहिल्या, तिसऱ्या व अंतिम संपर्क सत्रांचे आयोजन केले जाते.
पात्रता आणि निवड प्रक्रिया
शिष्यवृत्ती
अल्प-उत्पन्न पार्श्वभूमींमधील पात्र उमेदवारांसाठी मर्यादित शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. शिष्यवृत्तीसाठी अर्जप्रक्रिया १५ नोव्हेंबर २०२५ रोजी बंद होईल.
अर्ज करण्यासाठी भेट द्या: https://spjimr.org/pgpdm-admissions/