फोटो सौजन्य - Social Media
बँक ऑफ महाराष्ट्र या आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) भरती अधिसूचना 2025-26 (फेज II) जाहीर केली आहे. या भरतीद्वारे स्केल II, III, IV, V आणि VI या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. बँकेच्या प्रशासनात, तांत्रिक रचना मजबूत करण्यासाठी तसेच विविध क्षेत्रात कौशल्य असलेले व्यावसायिक जोडण्यासाठी ही संधी उपलब्ध झाली आहे.
या भरतीत IT, ट्रेझरी, लीगल, रिस्क मॅनेजमेंट, क्रेडिट, मार्केटिंग, फायनान्स आणि इतर विशेष विभागांमध्ये अधिकारी नेमले जाणार आहेत. देशातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अनुभवी उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा, त्यानंतर गटचर्चा (GD) किंवा मुलाखत यांवर आधारित असेल. अंतिम निवड ही उमेदवाराने मिळवलेल्या एकूण गुणांवर केली जाणार आहे.
उमेदवारांना केवळ अधिकृत वेबसाइट www.bankofmaharashtra.in वरूनच ऑनलाइन अर्ज करता येईल. अन्य कोणताही मार्ग मान्य केला जाणार नाही. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, पात्रता निकष पूर्ण होत आहेत का याची खात्री करूनच अर्ज करणे बंधनकारक आहे.
ऑनलाइन नोंदणी दरम्यान आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल. अपूर्ण अर्ज अथवा पात्रतेचा अभाव आढळल्यास उमेदवाराचा अर्ज नाकारला जाईल.
ही भरती विशेष पात्रता असलेल्या व्यावसायिकांसाठी करिअर घडविण्याची मोठी संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रसारख्या प्रतिष्ठित बँकेत नोकरी मिळाल्यास स्थिर नोकरीसोबतच व्यावसायिक प्रगतीची दारेही खुली होतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरच अधिसूचना तपासून अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करावा.






