फोटो सौजन्य- सोशल मीडिया
UPSC Exam Rules: परदेशात राहणाऱ्या अनेक भारतीय वंशाच्या तरुणांच्या मनात नेहमी हा प्रश्न येतो की, ते ‘यूपीएससी’ची (UPSC) नागरी सेवा परीक्षा देऊन आयएएस (IAS) किंवा आयपीएस (IPS) अधिकारी बनू शकतात का? अनेकदा लोक एनआरआय (NRI) आणि ओसीआय (OCI) कार्डधारकांना एकाच श्रेणीत समजतात, ज्यामुळे गोंधळ निर्माण होतो. मात्र, नियमांनुसार NRI आणि OCI कार्डधारकांसाठी UPSC परीक्षेचे नियम पूर्णपणे वेगळे आहेत. चला तर मग जाणून घेऊया यासंदर्भातील संपूर्ण माहिती सविस्तर..
NRI म्हणजे अशी व्यक्ती जी मूळची भारताची नागरिक आहे, पण शिक्षण किंवा नोकरीनिमित्त सध्या परदेशात राहते. त्यामुळे ती यूपीएससीची परीक्षा देऊ शकतात.
पात्रता: NRI कडे भारताचे नागरिकत्व (Indian Citizenship) असल्यामुळे ते UPSC परीक्षा देण्यास पूर्णपणे पात्र असतात. ते IAS, IPS, IFS यांसह UPSC द्वारे भरल्या जाणाऱ्या सर्व पदांसाठी अर्ज करू शकतात.
नियम: OCI (Overseas Citizen of India) कार्डधारकांसाठी नियम अतिशय कडक आहेत. UPSC च्या नियमांनुसार IAS, IPS आणि IFS या सेवांसाठी उमेदवार भारताचा नागरिक असणे अनिवार्य आहे.
Women in Police Force: देशात सर्वाधिक महिला पोलीस कोणत्या राज्यात? जाणून घ्या एका क्लिकवर…
मर्यादा: OCI कार्डधारक हे परदेशी नागरिक मानले जातात, त्यामुळे ते या सेवांसाठी अर्ज करू शकत नाहीत. (जरी काही केंद्र सरकारच्या इतर सेवांसाठी नेपाळ किंवा भूतानचे नागरिक पात्र मानले जात असले, तरी IAS आणि IPS ही पदे केवळ आणि केवळ भारतीय नागरिकांसाठीच राखीव आहेत.)
जरी NRI उमेदवारांना परीक्षा देण्याची परवानगी असली, तरी त्यांना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात:
कोणताही विशेष कोटा नाही: NEET किंवा इतर परीक्षांप्रमाणे UPSC मध्ये NRI साठी कोणताही वेगळा कोटा किंवा सवलत नसते. त्यांना सामान्य किंवा त्यांच्या मूळ प्रवर्गातूनच स्पर्धा करावी लागते. तसेच UPSC पूर्व, मुख्य किंवा मुलाखतीचे कोणतेही केंद्र परदेशात देत नाही. परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला भारतातच यावे लागते.
परदेशी पदवीसाठी इक्विव्हलन्स सर्टिफिकेट: जर एखाद्या NRI उमेदवाराने पदवीचे शिक्षण परदेशातील विद्यापीठातून केले असेल, तर अर्ज करण्यापूर्वी त्यांना ‘एसोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज’ (AIU) कडून Equivalence Certificate (समकक्षता प्रमाणपत्र) घेणे बंधनकारक आहे.






