फोटो सौजन्य - Social Media
सेंट्रल इंडट्रीअल सेक्युरिटी फोर्स (CISF)ने भरतीला सुरुवात केली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी ५ मार्च २०२५ पासून अर्ज करता येणार आहे. तर ३ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. जर तुम्ही CISF च्या भरतीची प्रतीक्षा करत होता तर या संधीचा लाभ नक्की घ्या. या भरतीच्या माध्यमातून कॉन्सटेबल ट्रेड्समनच्या पदासाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण भारतभरात या भरतीला आयोजित करण्यात आले आहे. या भरतीच्या माध्यमातून ११६१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी CISFच्या cisfrectt.cisf.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता. परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही.
उमेदवारांना भरतीचा अर्ज करण्यासाठी काही रक्कम भरावी लागणार आहे. जनरल प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज शुल्क म्हणून १०० रुपये भरावे लागणार आहे. तर इतर आरक्षित प्रवर्ग (SC / ST / PWD) यातून येणारे उमेदवारांना अगदी निशुल्क अर्ज करता येणार आहे. तर OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
अर्ज करताना उमेदवारांना काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. यामध्ये काही शैक्षणिक अटींचा समावेश आहे. तर उमेदवारांना काही अटी शर्ती वयोमर्यादे संदर्भात पात्र करावे लागणार आहेत. दहावी उत्तीर्ण असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त २३ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम cisfrectt.cisf.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर, ‘Apply Online’ या लिंकवर क्लिक करून ऑनलाइन अर्ज फॉर्म भरावा. अर्ज भरताना सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरावी आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत. अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विहित अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे. अर्ज सबमिट केल्यानंतर, भविष्यातील संदर्भासाठी त्याचा प्रिंटआउट काढून सुरक्षित ठेवावा, कारण निवड प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांसाठी तो आवश्यक ठरू शकतो.
निवड प्रक्रियेत शारीरिक चाचणी (Physical Test), लेखी परीक्षा (Written Exam), ट्रेड टेस्ट (Trade Test), दस्तऐवज पडताळणी (Document Verification) आणि वैद्यकीय तपासणी (Medical Examination) या पाच महत्त्वपूर्ण टप्प्यांचा समावेश आहे. उमेदवाराने प्रथम शारीरिक चाचणी उत्तीर्ण करावी लागेल, त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर संबंधित पदानुसार ट्रेड टेस्ट घेतली जाईल, जिथे उमेदवाराच्या व्यावहारिक कौशल्यांची चाचणी केली जाते. पुढील टप्प्यात, सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल, आणि शेवटी वैद्यकीय तपासणी होईल. प्रत्येक टप्प्यात पात्र ठरल्यानंतरच पुढील प्रक्रियेसाठी संधी मिळेल. त्यामुळे अर्ज करताना सर्व निकष आणि पात्रता अटींची काळजीपूर्वक पूर्तता करावी.