ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा: अमेरिकेत उभी राहणार जगातील सर्वात स्वच्छ रिफायनरी; रिलायन्सचा मोठा वाटा! ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
$300 Billion Texas Refinery Reliance Industries Investment: जागतिक राजकारण आणि अर्थकारणात सध्या एकाच नावाचा डंका ऐकू येत आहे, तो म्हणजे भारत! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी नुकतीच एक अशी घोषणा केली आहे, ज्याने चीनपासून युरोपपर्यंत सर्वांचे डोळे विस्फारले आहेत. ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणांतर्गत टेक्सासमधील ब्राउन्सविले येथे ३०० अब्ज डॉलर्सचा (अंदाजे २५ लाख कोटी रुपये) भव्य तेल शुद्धीकरण कारखाना (Oil Refinery) उभारला जाणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी ट्रम्प यांनी भारताचे आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) जाहीर आभार मानले आहेत.
अमेरिकेच्या इतिहासात गेल्या ५० वर्षांत एकही नवीन मोठी रिफायनरी बांधली गेली नव्हती. ट्रम्प यांनी ही कोंडी फोडली आहे. ट्रुथ सोशलवर पोस्ट करताना ट्रम्प यांनी म्हटले की, “अमेरिका पुन्हा एकदा उर्जेच्या क्षेत्रात जगावर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. हा ३०० अब्ज डॉलर्सचा करार केवळ अमेरिकन लोकांसाठीच नाही, तर जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी एक मैलाचा दगड ठरेल.” हा प्रकल्प दक्षिण टेक्सासमध्ये हजारो नोकऱ्यांची निर्मिती करेल आणि अमेरिकेला इंधनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘इराणच्या शत्रूंनो… तुमच्या नशिबाचा विचार करा,’ तेहरानने अमेरिकेला ठणकावले; युद्धात मृतांचा आकडा धडकी भरवणारा
या संपूर्ण घोषणेत सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले ते ट्रम्प यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजला दिलेल्या ‘थँक्स’ने. ट्रम्प यांनी स्पष्टपणे नमूद केले की, भारतीय भागीदारांच्या प्रचंड गुंतवणुकीशिवाय हा ऐतिहासिक करार पूर्ण होणे कठीण होते. रिलायन्स इंडस्ट्रीजने या प्रकल्पात मोठी भागीदारी घेतल्याने भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक आणि व्यापारी संबंध एका नव्या उंचीवर पोहोचले आहेत. मध्यपूर्वेतील युद्धाच्या काळात जेव्हा तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती आहे, तेव्हा रिलायन्सची ही गुंतवणूक धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे.
Donald Trump said the US will get its first new oil refinery in 50 years with the help of investment from India’s Reliance Industries https://t.co/TrJwMwFaSA — Bloomberg (@business) March 10, 2026
credit – social media and Twitter
ब्राउन्सविले बंदराजवळ हा प्रकल्प उभारला जाणार आहे. ट्रम्प यांच्या मते, ही जगातील सर्वात आधुनिक आणि सर्वात स्वच्छ रिफायनरी असेल. यामुळे केवळ अमेरिकन बाजारपेठेत स्वस्त इंधन उपलब्ध होणार नाही, तर अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षाही मजबूत होईल. जेव्हा इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेल वाहतूक धोक्यात आली आहे, तेव्हा हा प्रकल्प जगासाठी एक आशेचा किरण ठरणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Prices: अमेरिकेचा ‘तेल पराक्रम’ की तांत्रिक गोंधळ? इराणच्या काळजात धडकी; US मंत्र्याच्या ‘त्या’ पोस्टने हाहाःकार
३०० अब्ज डॉलर्स ही रक्कम केवळ एका रिफायनरीसाठी आहे की हा एका मोठ्या व्यापक ऊर्जा कराराचा भाग आहे, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण येणे बाकी आहे. मात्र, प्राथमिक अहवालानुसार २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीत या प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांचे काम सुरू होऊ शकते. ट्रम्प सरकारने या प्रकल्पासाठी परवाने देण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी केली असून करांमध्येही मोठी सवलत दिली आहे, ज्यामुळे रिलायन्स सारख्या कंपन्यांना अमेरिकेत गुंतवणूक करणे सोपे झाले आहे. भारताची सर्वात मोठी खाजगी कंपनी आता अमेरिकेच्या ऊर्जा क्षेत्राचे नशीब बदलण्यास तयार आहे. ट्रम्प आणि रिलायन्सचा हा ‘दोस्ताना’ चीनसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो, कारण यामुळे भारत-अमेरिका युती अधिक घट्ट होत आहे.
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी ३०० अब्ज डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांत सुमारे २५ लाख कोटी रुपयांच्या ऐतिहासिक कराराची घोषणा केली आहे.
Ans: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील 'रिलायन्स इंडस्ट्रीज' (Reliance Industries) या प्रकल्पात मोठी गुंतवणूक करत आहे.
Ans: हा प्रकल्प अमेरिकेतील टेक्सास राज्यातील 'ब्राउन्सविले' (Brownsville) या बंदराजवळ उभारला जाणार आहे.






