Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive Series: “भांडी, चहा आणि बदलाची सुरुवात…”, ‘मीना राजू मंच’ने बदलली विचारसरणी, घरकामातून दिला लिंगसमतेचा संदेश

धाराशिव जिल्ह्यातील वडगाव येथील हृषिकेश शिंदे या विद्यार्थ्याच्या आयुष्यात ‘मीना राजू मंच’ उपक्रमामुळे मोठा सकारात्मक बदल घडला आहे. घरकामातून लिंगसमतेचा संदेश दिला.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 05, 2026 | 01:18 PM
"भांडी, चहा आणि बदलाची सुरुवात...", ‘मीना राजू मंच’ने बदलली विचारसरणी, घरकामातून दिला लिंगसमतेचा संदेश

"भांडी, चहा आणि बदलाची सुरुवात...", ‘मीना राजू मंच’ने बदलली विचारसरणी, घरकामातून दिला लिंगसमतेचा संदेश

Follow Us
Follow Us:
  • ‘मीना राजू मंच’ने बदलली विचारसरणी
  • घरकामातून दिला लिंगसमतेचा संदेश
  • धाराशिवमधील हृषिकेशची कथा ठरतेय प्रेरणादायी
धाराशिवच्या हृषिकेशची प्रेरणादायी कहाणी: ‘मीना राजू मंच’ने बदलली विचारसरणी, घरकामातून दिला लिंगसमतेचा संदेश
“घरकाम फक्त मुलींचं नाही!” वडगावच्या विद्यार्थ्याचा आदर्श; मीना राजू मंचमुळे घडला मोठा बदल
लिंगभेदातून समतेकडे प्रवास: धाराशिवमधील हृषिकेशची कथा ठरतेय प्रेरणादायी

धाराशिव जिल्ह्यातील वडगाव गावात प्रत्येक सकाळ घडाळ्याच्या अलार्मच्या आवाजाने किंवा शाळा-नोकरीसाठी बाहेर पडायचंय या गडबडीने सुरू होत नाही. इथल्या सकाळची सुरूवात होते ती भांडी घासण्याच्या आवाजाने आणि चहासाठी ठेवलेल्या आधणाने. जिल्हा परिषद शाळेत आठवीत शिकणारा हृषिकेश शिंदे हा आपल्या दिवसाची सुरुवात कुटुंबासाठी चहा बनवून, आदल्या रात्रीची भांडी धुऊन आणि कधी कधी घरासाठी किराणा आणण्यासाठी दुकानात जाऊन करतो. त्याच्या वयाच्या मुलांसाठी हे काम मुली किंवा स्त्रियांचं आहे. पण हृषिकेशसाठी हे काम आता अभिमान आणि तत्त्वाचा प्रश्न आहे. फक्त एक वर्षापूर्वीपर्यंत हृषिकेशने वर्गातील कोणत्याही मुलीशी कधीच संवाद साधला नव्हता. ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक मुलांप्रमाणे त्याचाही विश्वास होता की घरकाम हे “बायकांचं काम” आहे आणि मुलांना ते करण्याची गरज नाही. लिंग समाभाव ही संकल्पनाच त्याला माहित नव्हती.

Exclusive Series: आंबेवाडी गावात मुलांच्या नेतृत्वाखाली ‘शून्य बालविवाह … 

हा बदल घडला तो मीना राजू मंच या उपक्रमामुळे.धाराशिव जिल्ह्यामध्ये गेली तीन वर्षे अंगाई-युनिसेफतर्फे (UNGEI-UNICEF) लिंग समभाव हा विषय खेळाधारित शिक्षणाद्वारे किशोरवयीन मुले-मुली, शिक्षक आणि गावातील समुदायांना शिकवण्यात आला. मीना राजू मंच हा कार्यक्रम इयत्ता ६ ते ८ वीचे विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आला असून लिंग समभावाशी संबंधित विविध पैलूंची माहिती त्यांना करून देण्यात येते. त्यामध्ये संवाद, खेळ, चर्चा अशा विविध उपक्रमांचा समावेश असतो. या कार्यक्रमात स्थानिक संस्था स्वयं शिक्षण प्रयोग (एसएसपी), कोरो आणि मावा यांचा सहभाग होता. त्यामध्ये शाळांसोबतच ग्रामपंचायत, गावातील लोक आदींनाही सहभागी करून घेण्यात आलं.

हृषिकेशसाठी हा अनुभव डोळे उघडणारा ठरला. तो म्हणतो, “हा माझ्यासाठी नवीन अनुभव होता. आम्ही आरोग्य, लिंगभेद, शरीररचना, परंपरा यांसारख्या विषयांवर चर्चा केली. याबद्दल इतक्या मोकळेपणाने आम्ही घरी किंवा शाळेत कधीच बोलत नव्हतो. मला जाणवलं की मुलींसाठी परिस्थिती किती अन्यायकारक आहे.”

मीना राजू मंचच्या एका सत्राने त्याच्यावर विशेष प्रभाव टाकला. त्यामध्ये विद्यार्थ्यांना मानवी शरीराचं चित्र काढायला सांगितलं गेलं. सुरुवातीला कुणीही प्रजनन अवयव काढले नाहीत. “आम्हाला खूप लाज वाटत होती,” तो सांगतो. पण वैज्ञानिक आणि वयोगटाला साजेशा चर्चेमुळे वातावरण बदललं. “आता मला समजलं की शरिराचे अवयव हे सामान्य आहेत. त्याबद्दल जाणून घेण्यात किंवा बोलण्यात लाज नाही.”

या अनुभवातून प्रेरित होऊन हृषिकेशने घरी छोटे बदल सुरू केले. त्याची आई शेतात कष्ट करते आणि घरकामही सांभाळते. हृषिकेशने तिला मदत करायला सुरुवात केली. सुरुवातीला गावातील लोकांनी त्याची खिल्ली उडवली. “मुलगा हे काम थोडीच करतो? ही मुलांची कामं नाही,” असे टोमणेही मारले. पण तो ठाम राहिला. तो म्हणतो, “मी काम करत राहिलो आणि सगळ्यांना सांगत राहिलो, काम म्हणजे काम असतं त्यात काही भेदभाव नको.” हळूहळू त्याचा परिणाम दिसू लागला. त्याचे काही मित्रही घरकाम करू लागले. कपडे धुणं, भात शिजवणं, अंगण साफ करणं, अशी कामं तेही घरी करू लागले. “ मीना राजू मंचच्या स्वयंसेविका ताईंनी आम्हाला दाखवलं की आपणच भेदभाव निर्माण करतो आणि एकमेकांना कमी लेखतो, ” तो सांगतो.

घराच्या पलीकडेही हृषिकेशने आपली भूमिका स्पष्ट केली. गावातील “उत्सव समतेचा” कार्यक्रमात त्याने लिंगभेदाविरुद्ध भाषण केलं. त्याच्या बोलण्याला उपस्थितांनी प्रतिसाद दिला. “गावातल्या लोकांनी माझं कौतुक केलं. त्यांनी हे मान्यं केले की, माझे विचार माझ्या वयापेक्षा पुढचे आहेत,” तो हसत म्हणतो.

आता त्याच्या शाळेतही अनेक बदल दिसतात. आधी मुलं आणि मुली वेगळे बसत असत. आता ते एकत्र बसतात, खेळतात आणि संवाद साधतात. शिक्षकही सर्वसमावेशक वातावरणाला प्रोत्साहन देतात. मीना राजू मंच इतका लोकप्रिय झाला आहे की विद्यार्थी स्वतः स्वयंसेविका ताईंना फोन करून बोलावतात. “आम्ही दर आठवड्याला त्यांना बोलावतो. त्या आल्या नाहीत तर त्यांना फोन करतो. त्यांच्या सोबत आम्ही आमचे प्रश्न, स्वप्नं आणि भीती मोकळेपणाने सांगू शकतो. त्यांच्याशी खूप चांगली मैत्री झाली आहे,” हृषिकेश सांगतो.

Exclusive Series: मुलगे साडीची घडी घालतात आणि मुली हाती हातोडा घेतात ..

त्याने आपल्या नातेवाईकांमध्येही लिंग समभावाबद्दल संवाद सुरू केला आहे. आपल्या चुलत बहिणींना समान शिक्षण आणि संधी मिळाव्यात यासाठी तो आग्रह धरतो. “खरा बदल हवा असेल तर तो घरापासूनच सुरू व्हायला हवा,” तो म्हणतो.
हृषिकेशने त्याच्या आयुष्यात केलेल्या छोट्या बदलाने त्याचं संपूर्ण कुटुंब प्रभावित झालं आहे. त्याच्या या छोट्या छोट्या कृतींमध्ये समाज बदलण्याची ताकद आहे. या सगळ्यामागे लिंग समभावाचा एक विचार प्रामुख्याने दिसून येतो. सातत्याने साधलेला संवाद आणि न घाबरता विचारलेले प्रश्न इतरांनाही विचार करायला भाग पाडतात. हृषिकेशने या लहान वयातच विचारांच्या साथीने मोठी झेप घेतली आहे. भविष्यात त्याच्यासारखे नेतृत्वच हा विचार पुढे घेऊन जाऊन समाजाला सर्वार्थाने बदलण्याची आणि सर्वसमावेशक बनवून समता प्रस्थापित करण्याची ताकद ठेवते.

संकलनः श्रुति गणपत्ये, माध्यम सल्लागार, युनिसेफ महाराष्ट्र

Web Title: Dharashiv hrushikesh shinde gender equality meena raju manch story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra
  • Student

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.