
pawar
परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयातील प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी डॉ. पवार यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण, रुग्णसेवा, वैद्यकीय विभागांचे समन्वय तसेच महाविद्यालयीन प्रशासनाशी संबंधित जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर असणार आहेत.
Cricket Scorer Career: क्रिकेट स्कोरर कसा बनतात? पात्रता, काम आणि पगार जाणून घ्या एका क्लिकवर..
डॉ. पवार हे धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात न्यायवैद्यकशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. न्यायवैद्यकशास्त्राच्या क्षेत्रातील त्यांच्या अनुभवासोबतच प्रशासकीय जबाबदारीही त्यांच्याकडे सोपविण्यात आल्याने त्यांच्या कार्याचा विस्तार झाला आहे.
परभणी येथील महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारल्यानंतर महाविद्यालयातील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासोबतच रुग्णालयीन सेवांचा समन्वय राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे. त्यांच्या नियुक्तीचे धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयातील सहकारी, विद्यार्थी आणि वैद्यकीय क्षेत्रातील विविध घटकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
AI College : भारतीय वंशाच्या दांपत्याची कमाल! त्यांच्या दानत्वातून उभे राहणार नवीन AI कॉलेज