फोटो सौजन्य- iStock
जगातील सर्वात महत्वाचे पण अनेक काळ दुर्लक्षित राहिलेले क्षेत्र म्हणजे पर्यावरण. विकासाच्या नावाखाली आपण निसर्गाची हानी केली आणि आज ज्यावेळी आपण अनेक वातावरणीय समस्यांचा सामना करत असून मानवाच्या अस्तित्वावर धोका निर्माण होऊ लागला आहे. त्यावेळी पर्यावरण क्षेत्राचे आपल्याला महत्व कळू लागले आहे. पर्यावरण क्षेत्र खुप व्यापक आहे. त्यामुळे पर्यावरण क्षेत्रातील करिअर संधी विविध आणि व्यापक आहेत, यात पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन, आणि शाश्वतता या तिन्ही घटकांचा समावेश होतो. या क्षेत्रातील प्रमुख करिअर पर्यायांमध्ये पर्यावरण शास्त्रज्ञ, पर्यावरण अभियंता, वनस्पतिशास्त्रज्ञ, वन्यजीव जीवशास्त्रज्ञ, शाश्वतता सल्लागार, पर्यावरण शिक्षण आणि जनजागृती, अपशिष्ट व्यवस्थापन, आणि जल संसाधन व्यवस्थापक यांचा समावेश आहे.
पर्यावरण क्षेत्रात करिअरसाठी आवश्यक असलेले शिक्षण
या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विविध शैक्षणिक पार्श्वभूमी आवश्यक आहेत. बॅचलर पदवी (B.Sc.) हे सुरुवातीचे पाऊल आहे, जे पर्यावरण शास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, किंवा संबंधित क्षेत्रात असू शकते. मास्टर्स (M.Sc.) आणि डॉक्टरेट (Ph.D.) पदवी उच्चस्तरीय संशोधन आणि तांत्रिक ज्ञानासाठी आवश्यक आहेत.
इतर शैक्षणिक पात्रता
व्यावसायिक प्रमाणपत्रे आणि प्रशिक्षण पर्यावरण व्यवस्थापन, GIS, जल गुणवत्ता परीक्षण, आणि इतर विशेष कौशल्यांमध्ये मिळवता येतात. अशा शैक्षणिक आणि व्यावसायिक तयारीमुळे पर्यावरण क्षेत्रात एक स्थिर आणि समाधानकारक करिअर करता येते.