भातकुली तालुक्यातील श्रीक्षेत्र वायगाव हे गाव धार्मिक व ऐतिहासिक अशा दुहेरी महत्त्वाने ओळखले जाते. येथे असलेली उजव्या सोंडेची अद्भुत गणेशमूर्ती आजही लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आहे. महाभारतातील विराट पर्वात पांडव अज्ञातवासात असताना चिखलदरा परिसरात आले होते. परतीच्यावेळी त्यांनी वायगाव येथील या गणेशमूर्तीचे दर्शन घेतले व अज्ञातवासाची अखेर केली, अशी अख्यायिका सांगितली जाते. या घटनेमुळे या मूर्तीला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.