मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या लातूर जिल्ह्यातील तरुणाचा मृत्यू झालाय. अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील ३४ वर्षीय विजय घोगरे या तरुणाचा मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईकडे जरांगे पाटील कूच करताना जुन्नर येथे एका मराठा कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर आता लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्याच्या टाकळगाव येथील विजय घोगरे यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. हा मृत्यू सरकारमुळेच झाल्याचा आरोप मयत घोगरे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार आणखी किती जणांचा बळी घेणार ? असा सवाल मयत विजय घोगरे यांचे चुलत भाऊ गोविंद घोगरे यांनी उपस्थित केलाय. आई, वडील, पत्नी आणि दोन लहान मुलं असा परिवार असलेले विजय घोगरे हे आपल्या आज नाहीत ही कल्पना कुटुंबियांना असह्य होत आहे. मुंबईत गेल्यावर आरक्षण घेऊन येतील या आशेवर बसलेल्या कुटुंबियांना आरक्षण तर मिळालंच नाही, पण आता विजय घोगरे यांचा मृतदेह बघण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने आता तरी आरक्षण देऊन हा जटिल होत असलेला विषय सोडविण्याची मागणी त्याचे कुटुंबीय करीत आहेत.