Hema Malini New Car: बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी (Hema Malini) आता राजकारणात सक्रिय आहेत. अलीकडेच त्यांनी निवडणूक उमेदवारी अर्जात आपली एकूण मालमत्ता जाहीर केली होती. आता त्यांनी मुंबईतील ओशिवरा येथील त्यांच्या दोन मालमत्ता विकल्याची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे, एका बाजूला त्यांनी करोडोंची मालमत्ता विकली असतानाच, दुसऱ्या बाजूला त्यांनी एक आलिशान कार खरेदी केली आहे.
एका बाजूला मालमत्ता विक्रीचा व्यवहार सुरू असतानाच, हेमा मालिनी यांनी एक नवीन महागडी कार खरेदी केली आहे. व्हायरल भयानीने शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, त्यांनी एमजी एम९ (MG M9) ही आलिशान कार खरेदी केली आहे, ज्याची किंमत अंदाजे ७० लाख रुपयांपासून सुरू होते.
हेमा मालिनी यांची नवीन कार एका खास पद्धतीने सजवण्यात आली आहे. ती रंगीबेरंगी फुग्यांनी भरलेली आहे. तसेच, कारच्या मागील बाजूस कुटुंबाचे फोटो आहेत, जे अभिनेत्री पाहत असल्याचे दिसून येत आहे. हेमा मालिनी यांना नवीन कार खरेदी केल्याबद्दल चाहते अभिनंदन करत आहेत. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत.
हेमा मालिनीने ओशिवरा येथील तिचे दोन फ्लॅट्स विकले आहेत. स्क्वेअर यार्ड्सच्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, त्यांनी हे दोन्ही फ्लॅट्स एकूण १२.५० कोटी रुपयांना विकले आहेत. प्रत्येक फ्लॅट ६.२५ कोटी रुपयांना विकला गेला असून, त्यात कार पार्किंगची जागाही समाविष्ट आहे. अंधेरी पश्चिमेकडील ओबेरॉय स्प्रिंग्ज हा मुंबईतील एक पॉश भाग मानला जातो. नोंदणी कागदपत्रांनुसार, दोन्ही फ्लॅट्सचा कार्पेट एरिया सुमारे ८४७ चौरस फूट आहे.
१९६३ मध्ये आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या हेमा मालिनी आता राजकारणी म्हणून लोकांची सेवा करत आहेत. त्या उत्तर प्रदेशमधील मथुरा लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची एकूण मालमत्ता १२२.१९ कोटी रुपयांची आहे. या मालमत्तेत त्यांची स्वतःची २.९६ कोटी रुपयांची संपत्ती असून, त्यात २.६ कोटी रुपयांचे शेअर्स आणि गुंतवणूक देखील समाविष्ट आहे. तसेच, त्यांच्याकडे ६२ लाख रुपयांच्या गाड्या आणि ३.३९ कोटी रुपयांचे दागिने आहेत.