म्यानमारमध्ये डिसेंबरमध्ये होणार सार्वत्रिक निवडणूका; भारताच्या सुरक्षा रक्षकांच्या देखरेखीखाली होणार मतदान (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Myanmar News in Marathi : नेपिदाव: एक मोठी माहिती समोर आली आहे. डिसेंबरमध्ये युद्धग्रस्त म्यानमारमध्ये (Myanmar) निवडणुका होणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी सार्वत्रिक निवडणुकांवर देखरेख ठेवण्यासाठी भारतातून एक पथकही पाठवले जाणार आहे. सोमवारी (१ सप्टेंबर) म्यानमारच्या सरकारी माध्यमांनी हा दावा केला आहे. यामुले सगळीकडे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) चीनच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान यावेळ पंतप्रधान मोदी चीनच्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी झाले होते. यावेळी भारतासह रशिया, बेलारुस, म्यानमार, तुर्की, पाकिस्तान, नेपाळ, ताजिकिस्तान, इजिप्त या देशांचे नेते सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi JInping) यांच्या आमंत्रणावरुन तियानजिनला गेले होते. दरम्यान यावेळी त्यांनी सर्व राष्ट्रांच्या नेत्यांची भेट घेतली.
तसेच म्यानमारचे लष्करप्रमुखही यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी म्यानमारचे लष्करप्रमुख मिन आंग ह्लाईंग यांची भेट घेतली. ही भेट अत्यंत महत्वपूर्ण होती असे सांगितले जात आहे.
ग्लोबल न्यू लाईट ऑफ म्यानमारने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी आणि लष्करीप्रमुख मिन आंग ह्लाईंग यांची भेट झाली. या बैठकीत दोघांनी भारत आणि म्यानमारच्या सीमावर्ती भागामध्ये शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा केली. तसेच दोन्ही देशात व्यापाराला प्रोत्साहन देण्यावर, मैत्री व सहकार्या वाढवण्यावरही विचार विनिमय करण्यात आला. यावेळी म्यानामारमध्ये होणाऱ्या निवडणुकावरही चर्चा करण्यात आली.
म्यानमारमध्ये गेल्या अनेक काळापासून युद्ध सुरु आहे. दरम्यान १९४८ पासून म्यानमारकमध्ये गृहयुद्ध सुरु होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यावेळी आंग सान सू की यांच्या नेतृत्तवाखाली निवडणुकीतील घोट्याळ्यामुळे सरकारला पदच्युत करण्यात आले होते. यानंतर म्यानमारमध्ये गृयुद्धाला सुरुवात झाली होती. वा्ंशिक वादातून हे युद्ध सुरु झाले होते. दरम्यान २०२१ च्या लष्करी उठावानंतर या युद्धाने तीव्र रुप धारण केले आहे.
दरम्यान या वेळी २८ डिसेंबर २०२५ रोजी देशात सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहे. म्यानमारच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार,
लष्कर-समर्थित अंतरिम प्रशासन देशभराती ३०० हून अदिक मतदार संघामध्ये मतदान करवू इच्छित आहे. यामध्ये सशस्त्र दल मुख्य विरोधी गट सामील आहे. दरम्यान यामुळे निवडणुंकादरम्यान गोंधळ उडण्यासाची शक्यता आहे. यासाठी भारत एक देखरेख पथक पाठवणार आहे.
रविवारी (३१ ऑगस्ट) भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. या निवदेनात सांगण्यात आले आहे की, भारत म्यानमारमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी एक देखरेख पथक पाठवणार आहे. भारताला आशा आहे की, म्यानमारमधील आगामी निवडणुका निष्पक्ष आणि समावेश पद्धतीने होती.
सध्या म्यानमारमधील परिस्थिती पाहता सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. म्यानमारच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या नऊ पक्षांनी देशव्यापी निवडणुकांसाठी नोंदणी केली आहे. तसेच ५ पक्षांनी प्रांतीय पातळीवनर नोंद केली आहे. यांना लष्कराकडून मान्यता मिळाली आहे.
अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनात भीषण अपघात; उड्डाणावेळी इंजिन बंद पडले अन् विमान थेट समुद्रात…, VIDEO