घराघरात गौरीचं आगमन झालं की पूजनाच्या दिवशी या माहेरवाशिणीला काही घरांमध्ये तिखट मांसाहाराचा नेवैद्य दाखवला जातो. माहेरवाशीण असलेल्या गौरीला तिखट मांसाहाराचा नैवेद्य दाखवल्या नंतर गणेशोत्सवासाठी गावात दाखल झालेले चाकरमानी आणि सारेच हा तिखटा सण जोरात साजरा करतात. रात्री गौरी समोर झिम्मा फुगडी सारखे महिलांचे खेळ रंगतील. कोकणातील गावागावातील घरात अगदी पहाटेपर्यंत गौरी समोर हा जागर सुरु राहतो.
माथेरान : गणपती उत्सवात गौराई चे आगमन होत असताना महिला मंडळ साजरा करीत असलेला ओवसा माथेरान मध्ये नेहमीच्या परंपरेत साजरा झाला. यानिमित्ताने ओवसा साजरा करीत असताना मोठ्या प्रमाणात खेळ महिलांनी सहकाऱ्यांसोबत खेळले आणि खेळांचा आनंद महिलांनी घेतला.
भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीला श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. गणेश भक्त आपल्याकडे दीड दिवसांचा तर काही भाविक ही पाच दिवसांसाठी आणि गौरींबरोबर,तर काही भाविक वामन नवमी आणि गणेश भक्त हे अनंत चातुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन करतात. मात्र गौरींचे आगमन एकाच वेळी होत असते.पूर्वापार सुरू असल्यासारखे आदल्या दिवशी गौराई ची मूर्ती आणून ठेवली जाते तर अनेक भक्त आदल्या दिवशी पहाटेच रानात जाऊन गौरी पूजनाच्या पूर्व संध्येपर्यंत कचोऱ्याची फुले ( गौरीची फुले ) व तेरड्याच्या फुलांसकटच्या फांद्या आणतात. त्यानंतर महिला रात्रभर गाणी गात गौर सजवण्यात गुंततात साडी नेसवून गौर सजवून त्यावर मुखवटा आणि पुठ्ठ्याचे हात लाऊन खुर्चीवर गौर बसवितात. कुणाच्या उभ्या गौरी तर कुणाच्या नाचऱ्या गौरी असतात. हल्ली गौरींचा मूर्ती आणण्याचे प्रमाण वाढले आहे. या गौरींच्या मूर्ती पूजनाच्या दिवशी आणल्या जातात. काही ठिकाणी त्या वाजत गाजत आणतात. त्यांचे पूजन मात्र सारख्याच पद्धतीचे असते.
माथेरान मधील महिलांनी ही परंपरा जपली असून गौराई चे आगमनाचे निमित्ताने घेतला जाणार ओवसा नेहमीच्या परंपरेत आज साजरा झाला.या सणासाठी महिलांकडून बांबूच्या पाती पासून बनवलेल्या सुपांची खरेदी केली होती.ते पूजा साहित्य यांनी भरलेले सूप नाचवत माथेरान मधील महिलांनी ओवसा साजरा केला.त्यावेळी विविध पारंपरिक खेळ तसेच पारंपरिक गाणी महिलांनी सादर करून या सणाचा आनंद घेतला.