लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याच्या निषेध (टीम नवराष्ट्र)
ओबीसी बांधवांच्या हाकेला साथ देत आज सकाळी नीरा येथील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला आणि काल घडलेल्या घटनेचा निषेध केला. यानंतर सकाळी दहा वाजता नीरा येथील ओबीसी बांधवांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र येत हाके यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याचा निषेध केला.
दरम्यान सभा सुरू असताना लक्ष्मण हाके यांनी फोनवरून उपस्थित अशी संवाद साधला. काहीही झालं तरी ओबीसी आरक्षणाला आपण धक्का लागू देणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थित त्यांना दिला त्याचबरोबर ओबीसी बांधवांना शांतता राखण्याचे देखील आवाहन केले.
यावेळी दादासाहेब गायकवाड, शंकरराव मर्दाने, गणपत लकडे, शितल चोरमले, विजय धायगुडे, प्रकाश कदम, राजेंद्र लकडे, ॲड. आदेश गिरमे, बबन गोफणे, संदिप धायगुडे, गणेश फरांदे, दयानंद चव्हाण, राजेंद्र बरकडे, अनिल चव्हाण, राजेश काकडे, सचिन मोरे, काळुराम चौधरी, गणेश गडदरे, गणेश केसकर, सरपंच तेजश्री काकडे, दत्ता चव्हाण, डॉ वसंतराव दगडे, यांनी मनोगत व्यक्त करत झालेल्या घटनेचा निषेध केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे प्रस्तविक नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम दगडे यांनी केले सूत्रसंचालन विष्णू गडदरे यांनी केले तर आभार अनंता शिंदे यांनी म्हणाले.