धनगर समाजाच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांमुळे संपूर्ण समाज आक्रमक झाला आहे. दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी एका भाषणा दरम्यान धनगर समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. या वक्तव्या मुळे संपूर्ण धनगर समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, समाजबांधवांची मनःस्थिती डळमळीत झाली आहे. प्रसारमाध्यमांच्या वतीने आणि समाजाच्या प्रतिनिधींनी जरांगे पाटलांना जाहीर माफी मागण्याची विनंती केली होती. मात्र, जरांगे पाटलांनी अद्याप कोणतीही माफी मागितलेली नाही.