Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Career News : परीक्षा शुल्क माफीची घोषणा फक्त कागदावरच, विद्यार्थ्यांना परतावा नाहीच

संकटांच्या काळात विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून परीक्षा शुल्क माफीच्या घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात याचा विद्यार्थ्यांना फायदा होत नसल्याचे समोर आले.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 19, 2026 | 02:55 PM
Government Announces Waiver of Examination Fees but Students Not Receive Benefit from Colleges

Government Announces Waiver of Examination Fees but Students Not Receive Benefit from Colleges

Follow Us
Follow Us:

Career News : पुणे : सोनाजी गाढवे : राज्यात नैसर्गिक आपत्ती, महामारी किंवा इतर संकटांच्या काळात विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून परीक्षा शुल्क माफीच्या घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात या घोषणांची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र समोर आले आहे.

स्टूडंट हेल्पिंग हँडस संस्थापक अँड. कुलदिप आंबेकर यांनी सांगितले की, “विविध महाविद्यालय आणि कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून पूर्ण परीक्षा शुल्क आधी वसूल केले जात असून, नंतर परतावा दिला जाईल असे सांगितले जाते. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना हा परतावा मिळालेला नाही. महाविद्यालयाच्या नोटीसनुसार शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना शुल्क माफी लागू होत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याची स्थिती आहे.

यामुळे परीक्षा शुल्क माफी योजना केवळ घोषणांपुरती मर्यादित राहत असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांवर याचा अधिक परिणाम होत असल्याचेही समोर आले आहे.

हे देखील वाचा : Interview द्यायला पोहोचला तर कंपनीच गायब! लोकं बोलायला लागले- नशीबच खराब, पण नेमकं काय घडलं?

सखोल चौकशीची मागणी
स्टूडंट हेल्पिंग हँडसचे संस्थापक अँड. कुलदिप आंबेकर म्हणाले की, या पार्श्वभूमीवर शासन आणि विद्यापीठांनी या प्रक्रियेची सखोल चौकशी करून स्पष्ट धोरण राबवावे, तसेच परताव्या ऐवजी थेट शुल्क न आकारण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य, त्यांच्या शिक्षणाचा हक्क हे केवळ घोषणांवर अवलंबून राहू शकत नाही. शासनाने आणि विद्यापीठांनी याकडे केवळ प्रशासनिक बाब म्हणून नव्हे, तर सामाजिक जबाबदारी म्हणून पाहण्याची गरज आहे.

हे देखील वाचा :  ‘RTE’ प्रवेश प्रक्रियेत नियोजनाचा अभाव; फक्त २६ हजार विद्यार्थांनी…

अर्धा महिना उलटला तरीही शिक्षकांना पगार नाहीच

राज्यातील माध्यमिक शिक्षकांचे वेतन गेल्या सहा महिन्यांपासून अनियमित होत असल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. वारंवार तक्रारी करूनही जिल्हास्तरीय यंत्रणा ढिम्म असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ असा प्रकार शिक्षण विभागात सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे. बँकेचा दंड आणि कौटुंबिक ओढाताण शिक्षकांच्या घरांच्या कर्जाचे हफ्ते अनेकांचे दर महिन्याच्या ५ तारखेला असतात. मात्र, महिन्याची १५ तारीख उजाडली तरी पगार बँक खात्यात जमा होत नाहीत. यामुळे बँकांकडून शिक्षकांना दंड आकारला जात आहे. नियमित पगार मिळत नसल्याने घराचा किराणा, वृद्ध आई-वडिलांचे औषधोपचार आणि मुलांच्या शिक्षणाची फी भरायची कशी, असा गंभीर प्रश्न शिक्षकांसमोर उभा ठाकला आहे. शिक्षण विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असल्याचे कारण पुढे करून इतर कर्मचारी आणि अधिकारी आपली नियमित कामे करण्यासही टाळाटाळ करत आहेत.

Web Title: Government announces waiver of examination fees but students not receive benefit from colleges

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Career News
  • Scholarship Exam
  • Student

संबंधित बातम्या

NEET Success Story: नीट यूजी परीक्षेपूर्वी मुलाचा मृत्यू, वडिलांनी दिली परीक्षा अन् आता ते बनणार डॉक्टर
1

NEET Success Story: नीट यूजी परीक्षेपूर्वी मुलाचा मृत्यू, वडिलांनी दिली परीक्षा अन् आता ते बनणार डॉक्टर

Canada Student Life: कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्यांशी मैत्री ठीक, पण स्थानिक मित्र बनवणे का आवश्यक?
2

Canada Student Life: कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्यांशी मैत्री ठीक, पण स्थानिक मित्र बनवणे का आवश्यक?

बारामतीची श्रावणी कुदळे नीट परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम, देशात मुलींमध्ये देखील अव्वल
3

बारामतीची श्रावणी कुदळे नीट परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम, देशात मुलींमध्ये देखील अव्वल

बदलत्या जगात सक्षम नेतृत्व घडवण्यासाठी वीस्कूल सज्ज! नव्या विद्यार्थ्यांसाठी ‘नवारंभ २०२६’चे दिमाखात आयोजन
4

बदलत्या जगात सक्षम नेतृत्व घडवण्यासाठी वीस्कूल सज्ज! नव्या विद्यार्थ्यांसाठी ‘नवारंभ २०२६’चे दिमाखात आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.