‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेत नियोजनाचा अभाव (फोटो- सोशल मिडिया)
25 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
प्रवेश प्रक्रियेत नियोजनाचा अभाव
तक्रार निवारण केंद्राची गरज
पुणे: राज्यात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत नियोजनाचा अभाव दिसून येत असून, अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सहा दिवसांत केवळ २५ हजार ६४५ हून आधिक विद्यार्थ्यांचे (Career News) प्रवेश निश्चित झाले आहेत.
शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदा राज्यातील ८ हजार ७०१ शाळांमध्ये एकूण १ लाख १४ हजार ८२६ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी २ लाख ८९ हजार २८६ अर्ज दाखल झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांची निवड यादीत नावे आली आहेत, त्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी २० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून शाळांमध्या प्रवेश घेणे बंधनकार आहे. मुदत वाढ देण गरजेच आहे. हे स्पष्ट दिसत आहे.
मुकुंद किर्दत यांनी सांगितले की, ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेत चौकशी समिती सक्रिय दिसत नाही. तसेच पालकांना आवश्यक कागदपत्रांबाबत स्पष्ट माहिती दिली जात नाही. विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये वडिलांनाच ग्राह्य धरण्याची पद्धत असून, आईलाही समान पालक म्हणून मान्यता दिली पाहिजे. प्रवेश प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
RTE प्रवेशासाठीचा ‘तो’ निर्णय शिथिल; विद्यार्थ्यांना होणार मोठा फायदा
तक्रार निवारण केंद्राची गरज
विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेश प्रक्रियेची पुरेशी माहिती नसते. त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, संपर्क क्रमांक किंवा माहिती केंद्र उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याची मागणी मुकुंद किर्दत यांनी केली.
‘आरटीई’ प्रवेश सुरू झाल्यानंतर दोन दिवस सुट्टी आल्याने प्रशासनावर ताण निर्माण झाला आहे. पडताळणी समित्या कार्यरत नाहीत. प्रवेश प्रक्रिया ढिसाळ असून नियोजनाचा अभाव आहे. नियुक्त शिक्षकांनाही कायद्याचे पुरेसे ज्ञान नाही. त्यामुळे शिक्षण विभागाचे नियोजन अपुरे ठरत आहे.
– मुकुंद किर्दत, आप पालक संघटना
‘आरटीई’ प्रवेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाची इच्छाशक्ती कमी दिसते. पालकांनीही या प्रक्रियेकडे अधिक लक्ष देऊन पुढाकार घेतल्यास प्रवेश प्रक्रिया जलद पूर्ण होऊ शकते.
– डॉ. शरद जावडेकर, अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा
Right To Education प्रवेशाबाबत राज्य सरकारला हायकोर्टाचा झटका; जाचक निर्बंध रद्द
सविस्तर आकडेवारी
प्रवेशाची शेवटची तारीख २० एप्रिल
शाळा – ८,७०१
अर्ज नोंदणी – २,८९,२८६
विद्यार्थ्यांची निवड – १,०५,८११
प्रतीक्षा यादी – ८६,०३४
विद्यार्थी प्रवेश – २५,६४५






