Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाविद्यालयांतील अतिरिक्त शुल्कांवर नियंत्रण आणणार! उच्च शिक्षण मंत्र्यांचा निर्णय

राज्यातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून विविध नावांनी आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्कांवर नियंत्रण आणण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 06, 2026 | 07:26 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

राज्यातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून विविध नावांनी आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्कांवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याबाबत माहिती देताना Chandrakant Patil यांनी सांगितले की, आता शुल्क नियामक प्राधिकरण केवळ ट्युशन फीवरच नव्हे तर इतर आकारल्या जाणाऱ्या शुल्कांवरही नियंत्रण ठेवणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अनावश्यक आर्थिक बोजा पडू नये, हा शासनाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“AI चा वापर शिका!” मोठमोठ्या तज्ज्ञांचे आवाहन; Sam Altman यांच्या मते,”टेक क्षेत्रात कोडिंग…”

भुसावळ (जि. जळगाव) येथील P. K. Kotecha Mahila Mahavidyalaya या महाविद्यालयात विद्यार्थिनींकडून जादा शुल्क आकारले जात असल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला होता. हा प्रश्न Aslam Shaikh यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर विद्यापीठाने या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीनंतर संबंधित महाविद्यालयाकडून वसूल केलेली अतिरिक्त रक्कम विद्यार्थिनींना परत देण्यात आली असून त्यावर दंडही आकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा दंड विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वापरण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

चौकशीदरम्यान काही महाविद्यालयांकडून पॉवर चार्जिंग, कॉम्प्युटर लॅब, मेंटेनन्स आदी नावांनी अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचेही समोर आले. त्यामुळे अशा प्रकारच्या शुल्कांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांकडून मनमानी पद्धतीने शुल्क आकारण्याच्या प्रकाराला आळा बसण्याची शक्यता आहे.

परदेशात शिकून तिथेच व्हायचंय सेटल? बाहेरगावी मिळेल नोकरी पण आधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

सध्या आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स या अभ्यासक्रमांची ट्युशन फी अत्यंत कमी ठेवण्यात आलेली आहे. तसेच ठरावीक उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शुल्क सवलतीचीही तरतूद आहे. मात्र काही महाविद्यालयांकडून ‘अदर फी’ किंवा इतर नावांनी अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर आता ट्युशन फीबरोबरच इतर सर्व प्रकारच्या शुल्कांवरही नियमन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण थांबेल आणि शिक्षण अधिक पारदर्शक व परवडणारे होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Higher education ministers decision to bring control over additional fees in colleges

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 07:26 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • Jalgaon

संबंधित बातम्या

Jalgaon Gold Rate | जळगावात सोन्याच्या दरात ५०० रुपयांची घसरण; दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
1

Jalgaon Gold Rate | जळगावात सोन्याच्या दरात ५०० रुपयांची घसरण; दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

Jalgaon News: जळगावात  बांभोरी पुलाजवळ कंटेनर आणि कारचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
2

Jalgaon News: जळगावात बांभोरी पुलाजवळ कंटेनर आणि कारचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

Chandrakant Patil : ‘EVM असो वा बॅलेट पेपर, जिंकणार आम्हीच!’ चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला
3

Chandrakant Patil : ‘EVM असो वा बॅलेट पेपर, जिंकणार आम्हीच!’ चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना टोला

Jalgaon Tribal Protest: आदिवासी बांधवांच्या मागण्यांवर सरकारची चर्चा; आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
4

Jalgaon Tribal Protest: आदिवासी बांधवांच्या मागण्यांवर सरकारची चर्चा; आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.