फोटो सौजन्य - Social Media
लक्षात घेण्याची सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे United States, Canada, United Kingdom आणि Australia सारखे देश त्यांच्या Visa नियमांमध्ये सतत बदल करत असतात त्यामुळे त्या गोष्टींचा अभ्यास असणे फार आवश्यक आहे. ते स्थलांतर नियम वाचा मगच बाहेरगावी झेप घ्या.
कोणत्या क्षेत्रात घडवावे करिअर?
लाखो-कोटींची गुंतवणूक करून बाहेरगावात शिकत आहात तर Science, Technology, Engineering, Mathematics (STEM) या क्षेत्रांमध्ये करिअर करणे कधीही उत्तम ठरेल. या क्षेत्रामध्ये आधीपासूनच भारतीय मोठ्या पदांवर आहेत. कॅनडा तसेच अमेरिकेमध्ये विज्ञान क्षेत्रात भारतीय उच्च पदावर आहेत, त्यामुळे कोणत्या देशातील कोणत्या क्षेत्रात भारतीयांना सर्वोच्च मागणी आहे? आणि तुम्ही कशात उत्तम आहात? या गोष्टीचा अभ्यास करा आणि त्याचे उत्तर शोधा आणि तयारीला लागा.
‘या’ कौशल्यांना करा अंगीकृत?
जर तुम्ही बाहेरगावी जातच आहात तर काही कौशल्य शिकून घ्या. या कौशल्यांमध्ये डिजिटल स्किल्स, डेटा अॅनालिसिस, समस्या सोडवण्याची क्षमता तसेच कम्युनिकेशन यांचा समावेश आहे. ही कौशल्य तुमचे भवितव्य घडवतील.
इंटर्नशिप, कॅम्पस प्लेसमेंट तसेच करिअर गाईडन्स यांच्या माध्यमातून आधीपासून करिअर प्लॅनिंग करा. परदेशात शिक्षण घेताना फक्त कॉलेजची रँकिंग न पाहता भविष्यातील नोकरीच्या संधी, स्किल्स आणि करिअर प्लॅनिंग यावर लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे.






