फोटो सौजन्य - AI
अशामध्ये जर तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलोपमेंट क्षेत्रात उंच भरारी घेऊ पाहत आहात तर एक गोष्ट लक्षात घेणे फार महत्वाची आहे की आता फक्त कोडींगचा अभ्यास असणे आवश्यक नाही. तर त्याचबरोबर भविष्यात होणारे बदल लक्षात घेऊन काही नव्या गोष्टींचा अभ्यास करणेही फायद्याचे ठरणार आहे, ते नवे तंत्रज्ञान म्हणजे AI! Open AI चे CEO Sam Altman म्हणतात की ” सॉफ्टवेअर डेव्हलोपमेंट क्षेत्रात करिअर करण्यासाठी आता फक्त कोडिंग पुरेसं नाही. तर आता AI टूल्स वापरण्याची क्षमता ही भविष्यातील मोठी स्किल ठरणार आहे.”
सूत्रांनुसार, जगभरात अर्ध्याहून जास्त कंपन्या आतापासूनच ५०% पेक्षा जास्त कोड AI च्या माध्यमातून लिहीत आहेत म्हणजे जगात सॉफ्टवेअर डेव्हलोपमेंट होणे थांबले नाही आहे पण ते काम करण्याची पद्धत पूर्णपणे बदललेली आहे. Anthropic चे CEO, Dario Amodei यांच्या मते लवकरच ९०% कोड AI तयार करू शकतो.
मग भविष्यात माणसांची भूमिका काय असेल?
AI शेवटी निर्जीवच! त्यामुळे सध्या सरळ कामांसाठी AI वापरता येऊ शकतो पण जेव्हा कामे कठीण असतील आणि खूप अडथळे असतील तेव्हा तिथे मानवी डोक्याचाच वापर करावा लागेल म्हणून त्यावेळी तद्न्य म्हणून माणसेच लागतील. महागडी पदवी नसली तरी चालेल, पण AI टूल्स वापरण्याची स्किल शिकली पाहिजे. भविष्यात फक्त कोडर न बनता AI वापरून काम करणारा क्रिएटर / डायरेक्टर बनणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.






