File Photo : Exam
स्पर्धा परिक्षा आणि बॅकेच्या रिक्त पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षांना कायमच प्रधान्य दिलं जातं. याचपार्श्वभूमीवर आता IBPS Po प्रिलिमचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. 19, 20 आणि 30 ऑक्टोंबरला झालेल्या परिक्षांचे निकाल लवकरच जाहीर होणार आहे. परिक्षा देणारे विद्यार्थी निकाल IBPo च्या संकेतस्थळावर पाहू शकता.हा निकाल पुढच्या परिक्षेचे पात्र उमेदवार ठरणार आहेत. ही परिक्षा अतीतटीची अतटीची असून बॅंकीग क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची परिक्षा म्हटली जाते. बॅंकींग क्षेत्रात उच्चपदावर नोकरी मिळवण्यासाठी ही परिक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे.
IBPS Po प्रिलीम परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. या परिक्षेअत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुख्य परिक्षा 30 नोव्हेंबर रोजी होणार असल्याचं सांगितलं आहे. याबाबतची माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आतापर्यंतच्या या परिक्षेची रचना पाहता तीन ते चार टप्यात यातून उत्तीर्ण झालेले उमेदवार उच्चपदासाठी पात्र होतो.
बॅंकेच्या या परिक्षेचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत IBPS संकेतस्थळावटर क्लिक करा. त्यांनतर रीझल्ट पर्यायावर क्लिक करा. त्यासाठी आपली जन्मतारीख आणि हजेरी क्रमांक टाका. त्यानंततर कॅप्चा कोड टाकल्यावर सबमि बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येेईल.
नेमकी ही परिक्षा असते तरी कशी जाणून घेऊयात
यंदाच्या IBPS Po परिक्षेची अधिकृत माहिती 1 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आली. त्यानंतर 11 ऑक्टोंबर रोजी इच्छुक उमेदवारांना त्यांचे ओळखपत्र जारी करण्यात आले होते. त्यानंतर ही परिक्षा 19, 20 आणि 30 या तीन टप्प्यात घेण्यात आली. त्यानंतर नोव्हेंबरचा तिसऱ्या आठवड्यात या परिक्षेचा निकाल लागणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतंं. या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परिक्षा प्रवेश 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. याच बरोबर पदाचं नाव, त्याबातचा अभ्यासक्रम आणि हजेरी क्रमांक याबाबतची सगळी माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मुख्य परिक्षा 30 नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. सध्या 30 तारखेला होणाऱ्या परिक्षेकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहेे. या पदांसाठी सामान्य ज्ञान, कम्पुटर कौशल्य आणि संवाद कौशल्य असणं उमेदवारांसाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे बॅंकींग विश्वात उच्च पदांसाठी इच्छुक उमेदवारांसाठी ही महत्त्वाती परिक्षा असल्याचं म्हटलं जातं.