• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Tvs Motor Units Sales In Marathi

TVS Motor ची कामगिरी! ३३,२९६ युनिट्सची विक्री, जानेवारीमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात केली कमाल

जानेवारी महिन्यात इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात TVS Motorने ३३,२९६ युनिट्सची विक्री करत अव्वल स्थान कायम राखले असून विक्रीत ३२ टक्के वाढ झाली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 03, 2026 | 09:27 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

यंदाच्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात TVS Motorने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. जानेवारी महिन्यात कंपनीने ३३,२९६ इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली असून, ही विक्री डिसेंबर महिन्याच्या तुलनेत सुमारे ३२ टक्क्यांनी अधिक आहे. TVS Motorच्या इलेक्ट्रिक पोर्टफोलिओमध्ये iQube हा लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर समाविष्ट असून, ग्राहकांकडून त्याला सातत्याने चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

वाहन चालवणे होईल अधिक स्वस्त, CNG च्या किमतीत होणार घट; खिशाला पडणार नाही भगदाड

वाहन पोर्टलवरील आकडेवारीच्या आधारे समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, Bajaj Autoनेही इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीत लक्षणीय वाढ नोंदवली आहे. जानेवारी महिन्यात बजाज ऑटोने २४,२११ इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली असून, ही विक्री सुमारे २८ टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीला आपल्या Chetak इलेक्ट्रिक स्कूटरच्या नव्या रेंजकडून मोठ्या अपेक्षा आहेत. जानेवारी महिन्यात बजाज ऑटोने Chetak C25 हे नवीन मॉडेल बाजारात दाखल केले आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत ९१,३९९ रुपये इतकी आहे.

Chetak C25 हा देशातील मेटॅलिक बॉडी असलेला एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्कूटरमध्ये LED हेडलॅम्प, साइड पॅनलवर नवीन ग्राफिक्स देण्यात आले आहेत. तांत्रिक बाबींचा विचार करता, या स्कूटरमध्ये २.५ kWh क्षमतेची बॅटरी आणि २.२ kW ची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. एका पूर्ण चार्जमध्ये हा स्कूटर सुमारे ११३ किलोमीटरची रेंज देतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, जानेवारी महिन्यात Ather Energyने इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात तिसरे स्थान पटकावले आहे. कंपनीने २०,७८६ युनिट्सची विक्री केली असून, विक्रीत २१ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, दुसरीकडे Ola Electricसाठी अडचणी कायम असल्याचे चित्र आहे. कंपनीची विक्री सुमारे २० टक्क्यांनी घटून ९,०२७ युनिट्सपर्यंत खाली आली आहे.

ग्राहकांकडून येणाऱ्या सर्व्हिसविषयक तक्रारी दूर करण्यासाठी ओला इलेक्ट्रिकने अलीकडेच ‘Hyperservice’ कार्यक्रम सुरू केला आहे. याशिवाय, कंपनीने S1 Pro+ मॉडेलसाठी 4680 Bharat Cell बॅटरी पॅक असलेल्या वाहनांची डिलिव्हरी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या बॅटरी सेलचे उत्पादन देशातच करण्यात आले असून, स्वतःचे बॅटरी पॅक आणि सेल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ठेवणारी ओला इलेक्ट्रिक ही भारताची पहिली कंपनी ठरली आहे.

जानेवारीत वाहन विक्रीत वाढ! ऑटोमोबाईल क्षेत्राची मोठी झेप, यंदाच्या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा उत्तम कामगिरी

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात ओला इलेक्ट्रिकला 4680 Bharat Cell बॅटरी पॅक असलेल्या Roadster X+ इलेक्ट्रिक मोटरसायकलसाठी सरकारकडून प्रमाणपत्रही मिळाले होते. सरकारी चाचणी संस्था International Centre of Automotive Technology (ICAT) कडून सेंट्रल मोटर व्हेईकल रूल्स अंतर्गत या वाहनाला मान्यता देण्यात आली आहे. एकूणच, इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये स्पर्धा अधिक तीव्र होत असताना, ग्राहकांसाठी नव्या पर्यायांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.

Web Title: Tvs motor units sales in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 09:27 PM

Topics:  

  • TVS
  • TVS iQube

संबंधित बातम्या

Bajaj Platina 100 की TVS Sport: रोजच्या वापरासाठी कोणती बाईक खरेदी करणे असेल फायद्याची डील?
1

Bajaj Platina 100 की TVS Sport: रोजच्या वापरासाठी कोणती बाईक खरेदी करणे असेल फायद्याची डील?

तुमची आमची आवडती बाईक महागली! आता TVS Raider 125 खरेदी करण्यासाठी ‘इतके’ अतिरिक्त पैसे द्यावे लागणार
2

तुमची आमची आवडती बाईक महागली! आता TVS Raider 125 खरेदी करण्यासाठी ‘इतके’ अतिरिक्त पैसे द्यावे लागणार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
TVS Motor ची कामगिरी!  ३३,२९६ युनिट्सची विक्री, जानेवारीमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात केली कमाल

TVS Motor ची कामगिरी! ३३,२९६ युनिट्सची विक्री, जानेवारीमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात केली कमाल

Feb 03, 2026 | 09:27 PM
Mumbai-Pune News: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर उलटला! मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प; प्रवाशांचे प्रचंड हाल

Mumbai-Pune News: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर उलटला! मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प; प्रवाशांचे प्रचंड हाल

Feb 03, 2026 | 09:12 PM
भारतीय क्षेपणास्त्रांची ताकद वाढली! DRDO कडून ‘SFDR’ तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी; शत्रूचा थरकाप उडणार

भारतीय क्षेपणास्त्रांची ताकद वाढली! DRDO कडून ‘SFDR’ तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी; शत्रूचा थरकाप उडणार

Feb 03, 2026 | 08:54 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
शिष्यवृत्ती परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ! ‘या’ तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत

शिष्यवृत्ती परीक्षांसाठी नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ! ‘या’ तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत

Feb 03, 2026 | 08:40 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Feb 03, 2026 | 03:09 PM
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.