फोटो सौजन्य - social media
प्रत्येक विश्वविद्यालयाचा एक लोकप्रतिनिधी असतो जो विद्यार्थी द्वारे कॉलेज किंवा विश्वविद्यालय विरोधात केलेल्या तक्रारींची शिफारस करतो. त्याला लोकपाल म्हणून ओळखले जाते. भारतात एकूण १,११३ विश्वविद्यालये आहेत. परंतु अद्याप सर्व विश्वविद्यालयांना लोकपाल नाही आहे. यासंबंधित विश्वविद्यालय अनुदान आयोग (यूजीसी) ने अद्ययावत यादी जारी केली आहे.
या अगोदर यूजीसी ने १ जून २०२४ रोजी ज्या विश्वविद्यालयांनी अद्याप लोकपालाची नियुक्ती केली नाही अशा विश्वविद्यालयांची यादी जारी केली होती. तो रिपोर्ट २०२३ च्या अनुसार होता. उच्च शिक्षण संस्थान (HEIs) कडून मिळालेल्या सूचनेनंतर अनेक विश्वविद्यालयांनी लोकपालाच्या नियुक्तीवर लक्ष केंद्रित करत त्यावर भर दिला. यूजीसी ने अद्ययावत यादी दिनांक १ जुलै २०२४ रोजी जारी केली आहे.
अद्ययावत यादीमध्ये एकूण ४६ सरकारी विश्वविद्यालये आहेत ज्यांनी अद्याप लोकपाल नियुक्त केलेला नाही. या यादीमध्ये ६ खाजगी विश्वविद्यालये तर ११ डीम्ड विश्वविद्यालयांचा देखील समावेश आहे. याआधीच्या यादीत एकूण १०८ सरकारी विश्वविद्यालयांचा समावेश होता ज्यांनी लोकपालची नियुक्ती केली नव्हती. तसेच जवळपास ४७ खाजगी विश्वविद्यालये आणि २ डीम्ड विश्वविद्यालये होती.
डिफॉल्टमध्ये असलेली विश्वविद्यालये आतादेखील यूजीसीच्या नियमांनुसार लोकपालाची नियुक्ती करू शकतात. लोकपालाची पूर्ण माहिती खालील ईमेलवर पाठवणे अनिवार्य आहे:
सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या बाबतीत: mssarma.ugc@nic.in
स्टेट युनिव्हर्सिटीच्या बाबतीत: smitabidani.ugc@nic.in
डीम्ड युनिव्हर्सिटीच्या बाबतीत: monika.ugc@nic.in
प्राइवेट युनिव्हर्सिटीच्या बाबतीत: amol.ugc@nic.in
यूजीसीची अद्ययावत यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर जा:
[यूजीसीची अद्ययावत यादी](https://www.ugc.gov.in/pdfnews/7225326_List-of-defaulting-Universities.pdf)