फोटो सौजन्य: Gemini
भारतीय ऑटो बाजारात नवनवीन बाईक लाँच होताना दिसत आहे. यातही ग्राहकांना बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये दमदार लूक आणि उत्तम मायलेज देणारी बाईक हवी असते. ग्राहकांची हीच मागणी Yamaha ने ऐकली आणि लाँच केली Yamaha XSR 155.
यामाहाने भारतात त्यांची पहिली निओ-रेट्रो रोडस्टर, XSR 155 लाँच केली आहे, ज्याची किंमत ₹1.50 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे. यामाहा XSR 155 चे चेसिस आणि पॉवरट्रेन त्याच्या Yamaha R15 आणि Yamaha MT-15 सारखेच आहे. ही बाईक चार वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे – मेटॅलिक ग्रे, विविड रेड, मेटॅलिक ब्लू आणि ग्रेइश ग्रीन मेटॅलिक. XSR 155 मध्ये दोन वेगवेगळ्या कस्टमायझेशन किट पर्याय आहेत – कॅफे रेसर आणि स्क्रॅम्बलर.
यामाहा XSR 155 ची किंमत 1.50 लाख (एक्स-शोरूम) आहे. या किमतीत, यामाहा XSR 155 ला स्पोर्टी लूक, वेगळेपणा आणि बजेट फ्रेंडली बाईक बनवते. XSR 155 ही स्टाइल आणि व्यक्तिमत्त्वाला महत्त्व देणाऱ्या रायडर्ससाठी एक अनोखी ऑफर आहे.
बिहार निवडणुकीत चर्चेत आलेले Tej Pratap Yadav यांचे ‘या’ Cars वर विशेष प्रेम, जाणून घ्या कार कलेक्शन
Yamaha XSR 155 ही निओ-रेट्रो डिझाइनवर आधारित बाईक आहे, ज्याला विंटेज बाईक्सची प्रेरणा मिळाली आहे. यात एलईडी हेडलँप, टियर-ड्रॉप आकाराचा फ्युएल टँक, मिनिमल बॉडी वर्क आणि सिंगल-पीस फ्लॅट सीट असे प्रमुख डिझाइन एलिमेंट्स पाहायला मिळतात.
Yamaha XSR 155 दोन अधिकृत कस्टमायझेशन किट्ससह येते – कॅफे रेसर आणि स्क्रॅम्बलर. सोप्या भाषेत सांगायचे तर, Yamaha XSR 155 ही मॉडिफिकेशनसाठी एक उत्तम बेस बाइक आहे. ॲक्सेसरी किटच्या मदतीने रायडर्स आपल्या आवडीप्रमाणे ही बाईक पर्सनलाइझ करू शकतात.
सिंगल-पीस आरामदायी सीट आणि सरळ, कम्फर्टेबल राइडिंग पोझिशनमुळे Yamaha XSR 155 रोजच्या शहरी प्रवासासाठी तसेच लांब राईडसाठी योग्य ठरते. यात ऑल-एलईडी लाइटिंग सेटअप, रेट्रो-थीम असलेला फील-एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ड्युअल-चॅनल ABS आणि ट्रॅक्शन कंट्रोल अशी फीचर्स दिली आहेत.
आता Four Wheeler मार्केट गाजवणार! दुचाकी बनवणाऱ्या Hero Motocorp ने सादर केली नवीन इलेक्ट्रिक कार
या बाईकमध्ये ॲडव्हान्स्ड डेल्टा बॉक्स चेसिसचा वापर करण्यात आला आहे, याचे साधारण 137 किलोचे हलके वजन तिला शहरातील ट्रॅफिकपासून वळणदार रस्त्यांपर्यंत कुठेही सहज हॅण्डल करता येण्यास मदत करते. यामध्ये 155 सीसी, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन दिले असून ते व्हेरीएबल वॉल्व ॲक्च्युएशन (VVA) तंत्रज्ञानासह येते, जे Yamaha R15 आणि MT-15मध्येही वापरले जाते.






