Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Inspiring Story: दीड वर्षाच्या मुलीला सोडून मसुरीत कडक प्रशिक्षण; पुण्याच्या डॉ. युगंधरा भोंडे बनल्या क्लास वन ऑफिसर..

Inspiring Story: यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर आणि अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकल्या लेकीचा विरह सहन करत डॉ. युगंधरा भोंडे यांनी मसुरीच्या आयटीबीपी अकॅडमीत हा टप्पा कसा गाठला? जाणून घ्या सविस्तर वृत्त.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 04, 2026 | 11:54 AM
Dr Yugandhara Bhonde

Dr Yugandhara Bhonde

Follow Us
Follow Us:

Medical Officer Inspiring Story: देशसेवा ही केवळ एक उपजीविकेचे साधन नसते तर मनात रुजलेली अखंड साधना आणि उराशी बाळगलेला ध्यास असतो. पुण्याच्या युगंधर भोंडे यांनी या वाक्याचा जिवंत वस्तुपाठ देशासमोर ठेवला आहे. डॉ. युगंधरा भोंडे यांनी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे (CAPF MOSB) अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे.  मसुरीत प्रशिक्षणानंतर त्या आता ‘असिस्टंट कमांडन्ट मेडिकल ऑफिसर’ (क्लास वन ऑफिसर) या उच्च पदावर विराजमान झाल्या आहेत. ज्यावेळी त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली होती. तेव्हा त्यांची मुलगी मीरा केवळ दीड वर्षांची होती.

पतीच्या देशसेवेतून प्रेरणा

डॉ. युगंधरा या मूळच्या नागपूरच्या असून दिवंगत प्रा. हरिदास आणि संध्या भोंडे यांच्या कन्या आहेत. त्यांना देशसेवेचा वारसा हा घरातून मिळाला असून त्यांनी भारतीय सुरक्षा दलातील प्रतीक सोनारे यांच्यासह विवाह केला होता. पतीची देशसेवा आणि त्यांचे देशाप्रती असलेले समर्पण हेच युगंधरा यांच्यासाठी मोठी प्रेरणा ठरली आहे.

Khan Sir News: खान सरांच्या कोचिंगवरील हल्ल्याने खळबळ; बिहारमध्ये चालतो तब्बल ‘इतक्या’ हजार कोटींचा कोचिंग व्यवसाय

मसुरीत सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण

यूपीएससी(UPSC) उत्तीर्ण असणाऱ्या डॉ. युगंधरा यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्लीमधील ‘एम्स’ (AIIMS) मध्ये काही काळ काम केले होते. असिस्टंट कमांडन्ट मेडिकल ऑफिसर या पदावर निवड झाल्यानंतर त्यांना मसुरीच्या आयटीबीपी अकॅडमीत सहा महिन्याच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले.

चिमुकल्या लेकीचा विरह आणि सासरच्यांची भक्कम साथ

मसुरीच्या जंगलातील थंडी आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य यापेक्षाही एक आई म्हणून डॉ. युगंधरा यांच्यासमोर सर्वात मोठ आव्हान होत. ते म्हणजे आपल्या अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकल्या लेकीपासून अनेक महिने दूर राहणे. एका आईसाठी आपल्या तान्ह्या बाळाला मागे सोडून देशसेवेचे व्रत घेणे हे कठोर तपश्चर्येपेक्षा कमी नव्हते. त्यांच्या या संघर्षाच्या काळात त्यांच्या सासरच्या कुटुंबीयांनी खंबीर साथ दिली. ज्यामुळे त्यांनी स्वत:ला य़शस्वीपणे सिद्ध करून दाखवले.

CBSE History: सीबीएसई बोर्ड अस्तित्वात येण्यापूर्वी देशात परीक्षा कशी व्हायची? जाणून घ्या रंजक इतिहास…

Web Title: Inspiring story dr yugandhara bhonde assistant commandant medical officer capf

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • inspiration
  • Latest pune news update
  • maharashtra
  • UPSC

संबंधित बातम्या

ग्रामीण भागात किती वेळ लोडशेडींगला कायदेशीर परवानगी आहे? यासंबंधित तुम्ही कुठे आणि कशी तक्रार नोंदवू शकता? जाणून घ्या
1

ग्रामीण भागात किती वेळ लोडशेडींगला कायदेशीर परवानगी आहे? यासंबंधित तुम्ही कुठे आणि कशी तक्रार नोंदवू शकता? जाणून घ्या

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट! चिपळूण उड्डाणपुलाची गंभीर दखल; पूर्ण कामानंतरच होणार खुला
2

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट! चिपळूण उड्डाणपुलाची गंभीर दखल; पूर्ण कामानंतरच होणार खुला

Srushti Death Case: सृष्टी मृत्यू प्रकरणानंतर रयत संस्था ॲक्शन मोडमध्ये; 200 विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा फेरआढावा
3

Srushti Death Case: सृष्टी मृत्यू प्रकरणानंतर रयत संस्था ॲक्शन मोडमध्ये; 200 विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा फेरआढावा

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका
4

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.