फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Khan Sir News: नुकत्याच बिहारमध्ये झालेल्या खान सरांच्या कोचिंग सेंटरवरील गोळीबारानंतर ज्ञान बिंदू कोचिंगच्या संचालकासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे कोचिंग माफिया आणि संस्थांमधील वर्चस्वाचा वाद पुन्हा एकदा उफाळत आहे. तरी या निमित्ताने आज आपण बिहारमधील कोचिंग विश्वाची व्याप्ती आणि बाजारपेठ नेमकी किती मोठी आहे हे जाणून घेणार आहेत.
खान सर यांच्या कोचिंग संटरवर झालेला हल्ला म्हणजे केवळ एक सुटी घटना नाही तर बिहारच्या अर्थव्यवस्था आणि समाजाचा कणा बनलेल्या एका विशाल उद्योगाची एक झलक आहे.
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, बिहारमध्ये सुमारे ३,००० खाजगी कोचिंग संस्थांची वार्षिक उलाढाल (Turnover) २५० कोटीपेक्षा जास्त होते. या क्षेत्रातील जाणकारांच्या मते, हा आकडा लवकरच १,००० कोटी रुपयांचा टप्पा पार करेल.
बिहारचे कोचिंग सेंटर देशाच्या कोचिंग क्षेत्रातील तेजीचा केंद्रबिंदू आहे. बिहारमध्ये ५२.५% विद्यार्थी खाजगी कोचिंग घेतात. याच कारणामुळे ते ‘कोटा’नंतर देशातील दुसरे सर्वात मोठे कोचिंगचे हब मानले जात आहे.
हा कोंचिग उद्योग लाखो लोकांना रोजगार देतो. बिहारमध्ये एका कोचिंग शिक्षकाचा पगार हा सुमारे ४.७२ लाख रुपये आहे. हा पगार नवख्या उमेद्वारांसाठी २.१६ लाखांपासून ते अनुभवी शिक्षकांसाठी ७.५ लाख रुपयांपर्यंत असू शकतो. संपूर्ण देशात हा उद्योग हजारो शिक्षक, समुपदेशक (Counselor) आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांना रोजगार पुरवत आहे.






