फोटो सौजन्य- सोशल मीडिया
History of CBSE Board: अलीकडे सीबीएसई बोर्डची चर्चा सर्वत्रच रंगली आहे. परंतु, तुम्हाला माहिती आहे का की, सीबीएसई बनण्यापूर्वी देशात बोर्ड परीक्षा कशा आयोजित केल्या जात होत्या. तसेच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कोण करायचे? आणि शिक्षण व्यवस्था कशा प्रकारे काम करायची? चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर..
वास्तविक पाहता सीबीएसईच्या (CBSE) स्थापनेपूर्वी शालेय शिक्षण आणि बोर्ड परीक्षांची जबाबदारी वेगवेगळ्या प्रांतीय विद्यापीठाकडे तसेच प्रादेशिक शिक्षण मंडळाकडे होती. त्या काळात आपल्या देशात कोणतेही केंद्रीय शिक्षण मंडळ नव्हते. प्रत्येक प्रांत किंवा क्षेत्र आपल्या शिक्षण व्यवस्थेनुसार परीक्षा आयोजित करत होते.
आपल्या देशात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पातळीवर परीक्षा पद्धतशीरपणे चालवण्यासाठी राज्यस्तरावर बोर्ड स्थापन केले होते. १९२१ मध्ये ‘यूपी बोर्ड ऑफ हायस्कूल अँड इंटरमीडिएट एज्युकेशन’ (UP Board) असे उत्तर प्रदेशातील पहिल्या बोर्डाचे नाव होते. त्या काळात यूपी बोर्डाचे कार्यक्षेत्र मोठे होते आणि ते अनेक भागातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आयोजित करायचे.
New CDS of India: जनरल अनिल चौहान यांच्यानंतर ‘या’ अधिकाऱ्याकडे देशाचे नव्या ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ ची सूत्रे…
त्यानंतर शिक्षणाच्या विस्ताराची गरज लक्षात घेऊन १९२९ मध्ये बोर्ड ऑफ हायस्कूल अँड इंटरमीडिएट एज्युकेशन, राजपुतानाची स्थापना केली. हे बोर्ड तत्कालीन राजपुताना अजमेर, मेरवाड, मध्य-भारत आणि ग्वाल्हेर यांसारख्या भागातील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले होते.
सीबीएसई बोर्डाच्या स्थापनेची गोष्टही रंजरक आहे, १९२९ मध्ये बनलेल्या या बोर्डाचा स्वातंत्र्यानंतर नवीन शैक्षणिक धोरणे आणि राष्ट्रीय गरजांनुसार विकास करण्यात आला. शेवटी १९५२ मध्ये याचे नाव बदलून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई करण्यात आले. या बोर्डासोबतच केंद्रीय संस्थेची सुरुवात होऊन माध्यमिक शिक्षणाला सुरुवात झाली. जी राष्ट्रीय पातळीवर माध्यमिक शिक्षणाला दिशा देऊ लागली.
NEET Paper Leak: २० लाखांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश? अहमदाबादच्या तरुणाने रेकॉर्डिंगसह केला खळबळजनक खुलासा
परंतु, सीबीएसईला खरी ओळख राष्ट्रीय स्तरावर १९६२ मध्ये मिळू लागली. त्या काळात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या राज्यांमध्ये सातत्याने बदली होत असे, अशा स्थितीत मुलांच्या शिक्षणावर परीणाम होऊ नये, म्हणून एकसमान अभ्यासक्रम आणि परिक्षा प्रणालीची गरज भासू लागली तसेच त्या काळातील परीक्षा व्यवस्था आजच्या तुलनेत खूपच मर्यादित होती.






