फोटो सौजन्य - Social Media
भारतात अनेक अभ्यार्थी UPSC-MPSC परीक्षा क्रॅक करून IPS, IAS अधिकारी बनू इच्छितात. अनके जण दिवसरात्र कष्ट घेऊन या परीक्षा पास करतात आणि त्यांच्या स्वप्नांची पूर्ती करतात. पण या दरम्यान त्यातील काही जण त्यांच्या पॉवरचा चुकीचा वापर करून दुष्कर्म करतात आणि वादाच्या भोवऱ्यात स्वतःला अडकवून बसतात. गेल्या काही वर्षात असे अनेक खटले पाहायला मिळाले आहेत. यादरम्यान असेच एक प्रकरण सध्या समोर आले आहे.
मुळचे हिंगोलीचे असणाऱ्या IPS अधिकारी पंडित राजेश उत्तमराव सध्या वादाच्या कचाक्यात सापडले आहेत. २००७ साली, पंडित उत्तमराव यांनी UPSC ची परीक्षा देशात २८९ रँकने पास केली होती. यानंतर पंडित उत्तमराव ओडिशाचे कॅडर अधिकारी बनले आणि DIG म्हणून काम करत होते. त्यांच्यावर एक खटला दाखल केला गेला आहे. एका विवाहित लेडी इन्स्पेक्टरच्या घरी जबरदस्ती घुसून तिच्यासोबत दुर्व्यव्हार करण्याचे आरोप त्या महिला इन्स्पेक्टरद्वारे करण्यात आले आहेत. त्यामुळे IPS अधिकरी पंडित राजेश उत्तमराव यांना त्यांच्या पदावरून बेदखल केले गेले आहे.
हे सुद्धा वाचा : मुंबई विद्यापिठात संचालक, प्राध्यापक पदासाठी भरती; मिळेल 1,44,200 रुपये पगार!
गृह विभागाच्या खात्याकडून निर्देश जारी केले गेले आहेत कि,” सदर IPS अधिकारी पंडित राजेश उत्तमराव यांच्यावर भारतीय पोलीस सेवेच्या सदस्याच्या रूपात गंभीर कदाचाराच्या आधारावर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी.” या निर्देशानुसार, IPS अधिकारी पंडित राजेश उत्तमराव यांना निलंबित केले गेले आहे. ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी खटल्याविषयी माहिती पडताच कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्या महिला इन्स्पेक्टरचे म्हणणे आहे कि IPS अधिकारी पंडित राजेश उत्तमराव याने जबरदस्ती घरात घुसून तिच्या पतीवरही हल्ला केला.