Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

10th Pass Govt Jobs : दहावीनंतर सरकारी नोकरीचे तुमचं स्वप्न होणार साकार; ‘या’ विभागांमध्ये मेगा भरती

तुमची दहावीची गुणपत्रिका ही केवळ शाळेतून उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र नाही, तर भारतीय रेल्वे, एसएससी आणि टपाल विभागासारख्या विभागांमध्ये प्रवेश मिळवण्याची पावती आहे.सरकारी नोकरी मिळवायची असेल तर दहावीच्या बेसवर मिळू शकते

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 30, 2026 | 01:07 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 10 वी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकऱ्या
  • दहावी पास झालेल्यांना सरकारी नोकऱ्या कुठे मिळतील?
  • दहावीनंतर सरकारी नोकरीची तयारी कशी करायची ?
10th Pass Govt Jobs : सरकारी नोकरी मिळवायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण या नोकऱ्या मिळवण्यासाठी बऱ्याच पदव्यांची गरज असते तरच आपल्याला सरकारी नोकरी मिळते. तर तसं नाहीये. तुम्हीही जर असा विचार करत असाल तर हा विचार बदला. तुमची दहावीची गुणपत्रिका ही केवळ शाळेतून उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र नाही, तर भारतीय रेल्वे, एसएससी आणि टपाल विभागासारख्या विभागांमध्ये प्रवेश मिळवण्याची पावती आहे. त्यामुळे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणापर्यंत धावण्याची गरज नाही जर सरकारी नोकरी मिळवायची असेल तर दहावीच्या पात्रतेवर आधारित सरकारी नोकरी मिळू शकते. ही नोकरी फक्त आर्थिक सुरक्षाच देत नाही, तर तरुण वयातच आपलं करिअर सेट करण्यासाठी मदत करते.

विद्यार्थ्यांना आता नो टेंशन…! शैक्षणिक दस्तऐवज सांभाळणे होणार सोपे, 10 वी, 12 वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकाच कागदावर

बऱ्याचवेळा, तरुण मुलं महाविद्यालयीन शिक्षण आणि मोठ्या मोठ्या पदव्या मिळवण्यासाठी आयुष्यातील महत्त्वाची वर्षे फुकट घालवतात. पण हे करताना आपल्याला एकीकडे प्रमुख सरकारी विभाग दहावी उत्तीर्ण स्टेजवर बऱ्याच पदांसाठी आपली वाट पाहत असतो. खरंतर कर्मचारी निवड आयोगापासून (SSC) ते ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीपर्यंत बऱ्याच विभागाता कुठेच संधींची कमतरता नाही. या प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांसाठी, पुस्तकी ज्ञानापेक्षा कठोर परिश्रम आणि आवड अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे तुम्हीसुद्धा दहावीची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाला असाल. तर या सरकारी नोकऱ्या तुमच्यासाठीच तर आहेत.

10 वी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकऱ्या

सर्वसाधारणपणे, सरकारी नोकर्‍यांसाठी डिग्रीपूर्ण करणं किंवा निदान १२ वीची परीक्षा उत्तीर्ण असणं फार गरजेचं मानलं जातं. पण असे बरेच विभाग आहेत तथापि, अनेक विभाग १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठीही भरतीची संधी देतात. नुकतेच बऱ्याच राज्यांमध्ये १० वीच्या बोर्डचे निकाल जाहीर झाले आहेत. राजस्थान बोर्ड १०वी निकाल २०२६ आणि बिहार बोर्ड १०वी निकाल २०२६ जाहीर झाल्यानंतर आता एमपी बोर्ड, यूपी बोर्ड आणि सीबीएसईसह इतर बोर्डदेखील लवकरच त्यांचे १०वीचे निकाल जाहीर करतील. १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी असलेल्या सरकारी नोकऱ्यांचा तपशील तुम्ही खाली पाहू शकता.

दहावी पास झालेल्यांना सरकारी नोकऱ्या कुठे मिळतील?

10 ची परीक्षा पास झालेल्यांसाठी बऱ्याच विभागांमध्ये सरकारी नोकऱ्या उपलब्ध आहेत. एसएससीपासून ते रेल्वेपर्यंत अशा बऱ्याच विभागांचा यात समावेश होतो. काही ठिकाणी तर परीक्षेशिवाय नोकरी मिळते आहे.

भारतीय टपाल विभाग : टपाल विभागातील ग्रामीण डाक सेवक पदांची भरती सामान्यतः दहावीच्या गुणांवर आधारीत गुणवत्ते वरुन केली जाते, ज्यामध्ये कोणत्याही लेखी परीक्षेची आवश्यकता नसते. तर दहावीमध्ये किती गुण आहेत यावरुन तुमची निवड केली जाते.

कर्मचारी निवड आयोग : SSC दरवर्षी मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) आणि जनरल ड्युटी म्हणजे GD कॉन्स्टेबल पदांसाठी भरती करते. 10 वीची परीक्षा पास झालेल्यांसाठी हा एक लोकप्रिय पर्याय आहे.

भारतीय रेल्वे (D विभाग) : जगातील सर्वात मोठा विभाग मानला जाणारा विभाग म्हणजे रेल्वेमध्ये ट्रॅक मेंटेनर, हेल्पर आणि इतर ‘गट ड’ विभाग या पदांसाठी १०वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

संरक्षण आणि निमलष्करी दल: दहावी उत्तीर्ण तरुण भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी 10 वी उत्तीर्ण उमेदवारांचा विचार केला जातो. तसेच बीएसएफ, सीआरपीएफ आणि सीआयएसएफमधील ट्रेड्समन पदांसाठी अर्ज करू शकतात.

राज्य पोलीस आणि होमगार्ड: जवळपास प्रत्येक राज्यात, पोलीस कॉन्स्टेबल आणि होमगार्ड पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता १०वी किंवा १२वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना संधी दिली जाते.

दहावीनंतर सरकारी नोकरीची तयारी कशी करायची ?

बहुतांश दहावी स्तरावरील सरकारी नोकऱ्यांसाठीची निवड प्रक्रिया दोन किंवा तीन टप्प्यांत पूर्ण केली जाते. पहिल्या टप्प्यात एक वस्तुनिष्ठ लेखी परीक्षा असते, ज्यात पुढील विषयांचा समावेश असतो. सामान्य ज्ञान, गणित, तर्कशास्त्र आणि हिंदी/इंग्रजी या विषयांवरील प्रश्नांचा समावेश असतो. संरक्षण आणि पोलीस सेवांसाठी, दुसऱ्या टप्प्यात अनिवार्य असलेली शारीरिक कार्यक्षमता चाचणी म्हणजे PET चाचणी घेतली जाते. शेवटी, कागदपत्रांची पडताळणी केली जाते. आणि त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते. जर विद्यार्थ्यांनी आतापासूनच या विषयांवर प्रभुत्व मिळवण्यास सुरुवात केली, तर ते पहिल्याच प्रयत्नात तुम्ही यश मिळवून सरकारी नोकरी मिळवू शकता.

Nashik School : मनपा शाळेत ‘वॉटर बेल’, उन्हाच्या तडाख्यापासून विद्यार्थ्यांचे होणार संरक्षण

Web Title: Jobs after 10th board results career guide railway ssc post office defense sarkari naukri for 10th pass marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • Career
  • Career News
  • Class 10th Students
  • Government Job
  • government jobs
  • Student Career Tips

संबंधित बातम्या

IIT Delhi AI Course: AI क्षेत्रात करिअरची संधी! IIT Delhiच्या नव्या कोर्सेससाठी असा करा अर्ज
1

IIT Delhi AI Course: AI क्षेत्रात करिअरची संधी! IIT Delhiच्या नव्या कोर्सेससाठी असा करा अर्ज

NDA Exam: इंग्रजीशिवाय सैन्यात अधिकारी कसे बनू शकता? जाणून घ्या एका क्लिकवर..
2

NDA Exam: इंग्रजीशिवाय सैन्यात अधिकारी कसे बनू शकता? जाणून घ्या एका क्लिकवर..

Defence Jobs: सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ तारखेला होणार एनडीए परीक्षा!
3

Defence Jobs: सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ तारखेला होणार एनडीए परीक्षा!

German language: इंग्रजीसोबतच जर्मन भाषा ठरत आहे रोजगाराची नवी चावी! जाणून घ्या शिकल्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रात मिळू शकते नोकरी
4

German language: इंग्रजीसोबतच जर्मन भाषा ठरत आहे रोजगाराची नवी चावी! जाणून घ्या शिकल्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रात मिळू शकते नोकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.