Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI ठरतोय Game Changer? TCS मध्ये नोकऱ्यांचा पॅटर्न बदलला! 24000 कर्मचारी कमी केले, 25000 फ्रेशर्सना दिली ऑफर

'Tata Consultancy Services' बाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कंपनीच्या एकूण कर्मचारी संख्येत घट झाली असली तरी, ती फ्रेशर्ससाठी महत्त्वपूर्ण संधी निर्माण करत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 13, 2026 | 02:50 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Tata Consultancy Services बाबत एक महत्त्वाची बातमी
  • कंपनीच्या एकूण कर्मचारी संख्येत घट झाली
  • फ्रेशर्ससाठी महत्त्वपूर्ण संधी निर्माण
TCS Hiring Update 2026: भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (‘Tata Consultancy Services’ ) बाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कंपनीच्या एकूण कर्मचारी संख्येत घट झाली असली तरी, ती फ्रेशर्ससाठी महत्त्वपूर्ण संधी निर्माण करत आहे. गेल्या वर्षभरात एकूण कर्मचारी संख्येत २४,००० ने घट झाली असली, तरी कंपनीने नव्या दमाच्या २५,००० फ्रेशर्सना नोकरीच्या ऑफर्स दिल्या आहेत. या बदलामागे नेमकं कारण काय? सविस्तर समजून घेऊयात

Job Alert : Civil Judge पदांच्या रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी; ‘या’ तारखेपर्यंत करु शकता अर्ज, जाणून घ्या सविस्तर

कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली पण भरती प्रक्रिया सुरु

TCS च्या म्हणण्यानुसार, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीची एकूण कर्मचारी संख्या अंदाजे २३,४६० ने कमी होऊन सुमारे ५.८४ लाख इतकी झाली. पण मार्च तिमाहीत कर्मचारी संख्येत किंचित वाढ देखील नोंदवली गेली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मते, ही घट केवळ कर्मचारी कपातीमुळे नाही, तर सुधारित कार्यपद्धती, वाढलेली उत्पादकता आणि काही पदांमधील बदलांमुळे देखील आहे.

फ्रेशर्ससाठी उत्तम संधी

कंपनीने स्पष्ट केले आहे की फ्रेशर भरतीवर कोणताही परिणाम होणार नाही. गेल्या वर्षी TCS ने ४४,००० नवीन प्रशिक्षणार्थींची भरती केली होती आणि या वर्षीही कंपनी कॅम्पस प्लेसमेंटद्वारे मोठ्या संख्येने तरुणांची भरती करत आहे. यावरून हे स्पष्ट होते की TCS हे इंजीनियरिंग आणि आयटी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रमुख रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारा आहे.

AI आणि नव्या स्कील्सवर फोकस

भविष्यातील गरजा लक्षात घेऊन, TCS आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI , कन्सल्टिंग आणि ॲडव्हायझरी यांसारख्या नवीन कौशल्यांवर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनी विशेष आणि प्रगत कौशल्ये असलेल्या बाह्य तज्ञांचीही नियुक्ती करत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, केवळ सामान्य कौशल्यांचीच नव्हे, तर ‘भविष्यासाठी सज्ज’ असलेल्या कौशल्यांची मागणीही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेवेळी याचा प्रकर्षाने विचार केला जात आहे.

AI मुळे जॉब कमी झालेत का?

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, कर्मचारी संख्येत कपात होण्यामागे एआय (AI) हे कारण नाही. कंपनीला भविष्यासाठी तयार करण्याकरिता हा बदल करण्यात आला आहे. शिवाय, कंपनीने असेही म्हटले आहे की, मनुष्यबळावरील प्रत्यक्ष परिणाम हा सुरुवातीला सांगितलेल्या २% पेक्षा कमी आहे.

कमाई घटली, पण AI कडून अपेक्षा जास्त

आर्थिक वर्ष २०२६ मध्ये TCS च्या कमाईत किंचित घट झाली. कंपनीच्या इतिहासात प्रथमच तिच्या इनकममध्ये घट झालेली जाणवली. पण AI-शी निगडीत महसूल वेगाने वाढत असून तो आता २.३ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. कंपनीचा विश्वास आहे की भविष्यात AI चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाईल, ज्यामुळे व्यवसाय वेगळ्या टप्प्यावर पोहोचेल.

भविष्यातील धोरण आणि गुंतवणूक

टीसीएस आता एआयच्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत असून नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. पायाभूत सुविधांपासून ते प्रगत बुद्धिमत्तेपर्यंतच्या क्षेत्रांमध्ये आपले स्थान अधिक मजबूत करण्याची कंपनीची इच्छा आहे. या उद्देशाने, टीसीएसने अनेक मोठ्या कंपन्यांसोबत भागीदारी केली असून डेटा सेंटर्ससारख्या प्रकल्पांवर काम करत आहे.

NEET UG 2026: सिटी इंटिमेशन स्लिप निर्गमित, असे तपासा तुमचे ‘परीक्षा शहर’, एका क्लिकवर

Web Title: Jobs tcs hiring update 2026 25000 fresher offers amid workforce decline ai hiring gains momentum marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • ai
  • Career News
  • Marathi News
  • Noel Tata
  • Ratan Tata
  • Tata company
  • tata motors news
  • TCS Jobs

संबंधित बातम्या

Bandkhor Marathi Movie: चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष
1

Bandkhor Marathi Movie: चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

Actor Rajat Bedi: बॉलिवूडनंतर मराठीत रजत बेदीची दमदार एन्ट्री! ‘बंधू’मध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका
2

Actor Rajat Bedi: बॉलिवूडनंतर मराठीत रजत बेदीची दमदार एन्ट्री! ‘बंधू’मध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका

Hrita Durgule: शाळेचा गणवेश, दोन वेण्या आणि खट्याळ हसू, हृता दुर्गुळेचा नवा लूक पाहिलात का?
3

Hrita Durgule: शाळेचा गणवेश, दोन वेण्या आणि खट्याळ हसू, हृता दुर्गुळेचा नवा लूक पाहिलात का?

Entertainment News: तीस वर्षांचा प्रवास आणि तीन नवे आवाज – पंचम निषादचा ‘वर्तमान’ पुन्हा रंगमंचावर
4

Entertainment News: तीस वर्षांचा प्रवास आणि तीन नवे आवाज – पंचम निषादचा ‘वर्तमान’ पुन्हा रंगमंचावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.