Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC School News: केडीएमसीच्या मराठी शाळेतील नववी-दहावीचे वर्ग बंद; ६० विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी, पालक संतप्त

केडीएमसीच्या मराठी शाळेतील नववी आणि दहावीचे वर्ग बंद केल्याच्या निर्णयामुळे तब्बल ६० विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. विद्यार्थ्यांना मार्कशीट आणि लिव्हिंग सर्टिफिकेट न दिल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 08, 2026 | 01:33 PM
केडीएमसीच्या मराठी शाळेतील नववी-दहावीचे वर्ग बंद; ६० विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी, पालक संतप्त

केडीएमसीच्या मराठी शाळेतील नववी-दहावीचे वर्ग बंद; ६० विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी, पालक संतप्त

Follow Us
Follow Us:
  • 60 विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला
  • विद्यार्थी पालक आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे संतापले
  • मी हिंदी भाषिक मुलांना मराठी शाळेत शिकवते आणि तुम्ही मराठी वर्ग बंद करता
  • एका महिला पालकाचा संतापाने केडीएमसी अधिकारी नि शब्द
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) मराठी माध्यम शाळेतील नववी आणि दहावीचे वर्ग अचानक बंद करण्यात आल्याचा आरोप समोर आल्याने विद्यार्थी, पालक आणि स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे 2026 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुमारे 60 विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका (मार्कशीट) आणि शाळा सोडल्याचा दाखला (लिव्हिंग सर्टिफिकेट) मिळालेला नाही. त्यामुळे अकरावी प्रवेशाची अंतिम मुदत जवळ येत असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे मार्कशीट आणि लिविंग सर्टिफिकेट त्वरित देण्याचे आदेश देत संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशा आश्वासन पीडीएमसी उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिले आहे.

दाखला, मार्कलिस्टसाठी अवैध रक्कम वसूल करुन नका, अन्यथा…; शिक्षण विभागाचा इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मराठी शाळेतील नववी आणि दहावीच्या वर्गांबाबत अचानक निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शाळा प्रशासनाने स्पष्ट माहिती न दिल्याने पालकांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढली आहे. अनेक पालकांनी शाळेत धाव घेत प्रशासनाकडे जाब विचारला. या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारीही आक्रमक झाले असून त्यांनी शाळा प्रशासन आणि केडीएमसी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, वर्ग पुन्हा सुरू करावेत आणि विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे तातडीने द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, एका महिला पालकाने अधिकाऱ्यांवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. “मी हिंदी भाषिक मुलांना मराठी शाळेत शिकवते आणि तुम्ही मराठी वर्गच बंद करता?” असा सवाल करत त्यांनी मराठी शिक्षणाबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासनाने संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत. संबंधितांवर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती केडीएमसीच्या उपायुक्तांनी दिली आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

UGC Single Girl Child Scholarship: एकुलत्या एक मुलीला उच्च शिक्षणासाठी मिळणार ७२,४०० रुपये; लगेच चेक करा पात्रता!

Web Title: Kdmc marathi school 9th 10th classes closed students future at risk kalyan dombivli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • education news
  • KDMC
  • School

संबंधित बातम्या

Preschool India : युरोकिड्सचा मोठा उपक्रम; 18-24 महिन्यांच्या बालकांसाठी ‘ज्युनिअर प्लेग्रुप’ कार्यक्रमाची सुरुवात
1

Preschool India : युरोकिड्सचा मोठा उपक्रम; 18-24 महिन्यांच्या बालकांसाठी ‘ज्युनिअर प्लेग्रुप’ कार्यक्रमाची सुरुवात

Sonam Wangchuk School: सोनम वांगचूक यांच्या शाळेचं नाव तरी काय? कसा मिळतो या शाळेत प्रवेश
2

Sonam Wangchuk School: सोनम वांगचूक यांच्या शाळेचं नाव तरी काय? कसा मिळतो या शाळेत प्रवेश

NMC चा मोठा निर्णय! आता मेडिकल कॉलेज स्वतःच करणार Faculty ची नियुक्ती आणि पदोन्नती
3

NMC चा मोठा निर्णय! आता मेडिकल कॉलेज स्वतःच करणार Faculty ची नियुक्ती आणि पदोन्नती

Tasgaon News: तासगावच्या पालिका शाळा अंधारात; विरोधकांचे ‘भीक मागो’ आंदोलन, सत्ताधाऱ्यांवर शिक्षणाशी खेळल्याचा घणाघात
4

Tasgaon News: तासगावच्या पालिका शाळा अंधारात; विरोधकांचे ‘भीक मागो’ आंदोलन, सत्ताधाऱ्यांवर शिक्षणाशी खेळल्याचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.