फोटो सौजन्य- सोशल मीडिया
UGC Single Girl Child Scholarship: उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे (UGC) ‘पोस्ट ग्रॅज्युएट इंदिरा गांधी स्कॉलरशिप फॉर सिंगल गर्ल चाइल्ड’ (Post Graduate Indira Gandhi Scholarship for Single Girl Child) ही योजना चालवली जात आहे. या योजनेअंतर्गत अशा विद्यार्थिनींना वित्तीय सहाय्य प्रदान केले जाते, जे आपल्या पालकांचे एकुलते एक अपत्य आहे आणि नियमितपणे पदव्युत्तर म्हणजे मास्टर डिग्रीचे (PG) शिक्षण घेत आहेत.
या स्कॉलरशिपला पात्र वि्द्यार्थीनींना दोन वर्षांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. जेणेकरून त्या कोणत्याही आर्थिक अडचणीशिवाय आपले शिक्षण सुरू ठेवू शकतील. या स्कॉलरशिपद्वारे प्रतिवर्ष ३६,२०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. दोन वर्षापर्यंत ७२,४०० रुपयांची रक्कम विद्यार्थिनी्च्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. दरवर्षी ३,००० या शिष्यवृत्तींचा विद्यार्थिनींना फायदा होतो.
या स्कॉलरशिपचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे अर्ज करण्यासाठी कुटुंबाच्या उत्पन्नाशी संबंधित कोणतीही अट नाही म्हणजेच आर्थिक परिस्थिती काहीही असली तरी पात्र विद्यार्थिनी या योजनेस अर्ज करू शकतील.
या स्कॉलरशिपला एकुलते एक अपत्य किंवा जुळ्या बहिणी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याऱ्या विद्यार्थिनीचे वय मास्टर डिग्रीच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेत्यावेळी ३० वर्षापेक्षा कमी असावे. तसेच ती कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये नियमित आणि पूर्ण वेळ मास्टर डिग्रीच्या कोर्सच्या पहिल्या वर्षात शिकत असावी. परंतु, या स्कॉलरशिपचा लाभ व्यवसायिक (Professional) कोर्सेच्या विद्यार्थिनींना घेता येणार नाही.
या स्कॉलरशिपसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या (National Scholarship Portal) अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाईन अर्ज करावा. इच्छुक व पात्र विद्यार्थिनींनी पोर्टवर नोंदणी करून ‘Post Graduate Indira Gandhi Scholarship for Single Girl Child’ या योजनेची निवड करावी.






