Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tasgaon News: तासगावच्या पालिका शाळा अंधारात; विरोधकांचे ‘भीक मागो’ आंदोलन, सत्ताधाऱ्यांवर शिक्षणाशी खेळल्याचा घणाघात

तासगाव नगरपालिकेच्या शाळांमधील थकीत वीज बिलाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने 'भीक मागो' आंदोलन केले. मुख्याध्यापकांनी स्वतःच्या पगारातून २.२५ लाख रुपये भरल्याचा आरोप सुशीला जाधव यांनी केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 17, 2026 | 05:25 PM
तासगावच्या पालिका शाळा अंधारात; विरोधकांचे 'भीक मागो' आंदोलन

तासगावच्या पालिका शाळा अंधारात; विरोधकांचे 'भीक मागो' आंदोलन

Follow Us
Follow Us:
  • तासगावच्या पालिका शाळा अंधारात
  • विरोधकांचे ‘भीक मागो’ आंदोलन,
  • सत्ताधाऱ्यांवर शिक्षणाशी खेळल्याचा घणाघात
तासगाव: तासगाव नगरपालिकेच्या शाळांमधील वीज बिलाचा प्रश्न अखेर रस्त्यावर आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने शुक्रवारी ‘भीक मागो’ आंदोलन करत पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचा आरोप करत, शाळांना अंधारात ठेवणाऱ्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे विरोधी पक्षनेत्या सुशीला जाधव यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना जाधव यांनी पालिका प्रशासनावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. नगरपालिकेच्या निष्काळजी कारभारामुळे गेल्या सहा महिन्यांपासून मुख्याध्यापकांना स्वतःच्या पगारातून शाळांचे वीज बिल भरावे लागत आहे. आतापर्यंत ही रक्कम तब्बल २ लाख २५ हजार रुपयांवर पोहोचली असून, प्रशासनाने अद्याप एक रुपयाही परत दिलेला नसल्याचा आरोप त्यांनी केला.

शहरातील पालिका शाळांचे दरमहा ४० ते ५० हजार रुपयांचे वीज बिल थकले असून, अनेक शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, तासगाव येथील क्रमांक १४ शाळेचे केवळ १,६५० रुपयांचे मीटर बिल न भरल्याने वीज तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही त्यांनी उघड केला.

केवळ वीज बिलाचा प्रश्न नाही, तर संपूर्ण पालिका शिक्षण व्यवस्थाच ढासळल्याचा आरोप करत जाधव म्हणाल्या, अनेक शाळांच्या इमारती गळक्या आहेत, कंपाऊंड भिंती नाहीत, स्वच्छतागृहांची अवस्था बिकट आहे. कंत्राटी शिक्षकांची संख्या घटल्यामुळे एका शिक्षकावर अनेक वर्गांचा भार पडत आहे. पेटकर प्लॉट परिसरातील शाळेत तर जागेअभावी लहान विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सांगली जिल्हा परिषदेत मुद्रणालय, सोलर आणि टेंडर घोटाळ्यांवर खळबळ; चौकशी समित्यांची घोषणा, अधिकाऱ्यांवर सदस्यांचा निशाणा

नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे पालिका शाळांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेली ही खेळवणूक थांबवण्यासाठी आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही ‘भीक मागो’ आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून, जमा झालेल्या निधीतून शाळांची थकीत वीज बिले भरण्याचा निर्णय घेतल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.

यावेळी नगरसेवक रामचंद्र माळी, अभिषेक देशिंगकर, अरुण साळुंखे, पूनम माळी, सचिन कांबळे, अहमद मुजावर, ज्योती कोळी, उषा कांबळे, शोभा जाधव, अमृता माळी, तुकाराम कुंभार, माजी नगरसेवक बाळासो सावंत, युवा नेते स्वप्निल जाधव, खंडू कदम आदी उपस्थित होते.

आंदोलनातून केलेल्या प्रमुख मागण्या

  • पालिका शाळांची थकीत वीज बिले तातडीने अदा करावीत.
  • मुख्याध्यापकांनी स्वतःच्या पगारातून भरलेल्या २.२५ लाख रुपयांची त्वरित परतफेड करावी.
  • खंडित झालेला वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करावा.
  • गळक्या इमारती, स्वच्छतागृहे व कंपाऊंड भिंतींची तातडीने दुरुस्ती करावी.
  • रिक्त शिक्षक पदे भरून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय दूर करावी.
UPSC Success Story: वडिलांचे छत्र हरपले, आई आणि भावाने शेतात घाम गाळला; सांगलीच्या ऋतुराज पाटीलची यूपीएससी परीक्षेत ‘बाजी’!

Web Title: Tasgaon municipal schools left in the dark opposition stages begging protest slams ruling party for playing games with education

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 04:39 PM

Topics:  

  • electricity
  • Maharashtra Education
  • School
  • Tasgaon
  • Tasgaon News

संबंधित बातम्या

Shrikant Shinde: ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि आरोग्य केंद्रांचा कायापालट होणार! ४०० कोटींचा आराखडा; श्रीकांत शिंदेंचे निर्देश
1

Shrikant Shinde: ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि आरोग्य केंद्रांचा कायापालट होणार! ४०० कोटींचा आराखडा; श्रीकांत शिंदेंचे निर्देश

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
2

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.