फोटो सौजन्य - Social Media
भारतात साक्षरतेचे प्रमाण अतिशय वेगाने जरी वाढत असले तरी त्याचबरोबर बेरोजगारीचाही प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे भारतीय युवा मोठ्या संख्येने बेरोजगार आहेत. बेरोजगारीच्या या समस्येला संपूर्ण भारत देश त्रासला आहे. अनेक युवक तर देशाच्या बाहेर इतर देशांमध्ये जॉबच्या शोधात निघून जात आहेत. पूर्वीच्या काळी साक्षरता कमी असल्याने रोजगाराच्या संधी अनेक होत्या. पण आताच्या काळी जरी औद्योगिकीकरणाने रोजगाराच्या अनेक संध्या निर्माण झाल्या असल्या तरी वाढत्या साक्षरतेच्या प्रमाणाने स्पर्धा तयार झाली आहे. या स्पर्धेच्या वातावरणात प्रत्येकाला संधी मिळणे शक्य नाही. पण अशा काही काम आहेत जे आताच्या वातावरणाला पूरक आहेत. ज्याच्या माध्यमातून अनेक जण महिन्याला लाखोंची कमाई करत आहेत. जर तुम्हालाही त्या क्षेत्राबद्दल जाणून घ्यायचे आहे तर लेख पूर्ण नक्की वाचा.
या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला हवे ते मिळणे शक्य नाही आहे. स्पर्धेत प्रत्येकाला जिंकता येत नाही, कुणाला तरी माघार घ्यावीच लागते. पण या डिजिटल युगात काही असे नवीन क्षेत्र आहेत जिथे अद्याप स्पर्धेला सुरुवात झाली नाही आहे. या क्षेत्रामध्ये आपल्या करियरला गती देऊन नवीन सुरुवात करता येऊ शकते. डिजिटल युगातील सगळ्यात प्रसिद्ध झालेले काम म्हणजे ग्राफिक डिझाइनर आहे. अनेक जण या कामातून हमखास कमाई करत आहेत तर काही जण याला साइड बिझनेस म्हणून अनेक पैसे छापत आहेत. आजकाल अनेक न्यूज चॅनल्स, यूट्यूब चॅनल्स तसेच PR कंपनी ग्राफिक डिझाइनरच्या पदासाठी भरती करून घेत आहेत. त्याचप्रमाणे अनेक ग्राफिक डिझाइनर फ्रीलान्सर म्हणून कामे करून हजारोंची कमाई करत आहेत.
भारतीय प्रशासन देशात उद्योगांच्या निर्मितीसाठी अनेक उपक्रम राबवताना दिसत आहे. आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टासाठी गेल्या 8 वर्षांत, FMCG, तंत्रज्ञान आणि फिनटेक इत्यादींवर देशात सुमारे 1.5 लाख स्टार्टअप उघडले आहेत. स्टार्ट अप इंडियाच्या माध्यमातून प्रशासन देशात अनेक स्टार्टअप उभारण्यात मदतीचा हात देत आहे.